मंगळवेढ्याच्या 24 गाव पाणी योजनेला महायुतीचे सरकारच निधी देऊन योजना पूर्ण करेल -रामेश्वर मासाळ

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मंगळवेढ्याच्या 24 गाव पाणी योजनेला महायुतीचे सरकारच निधी देऊन योजना पूर्ण करेल -रामेश्वर मासाळ

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील शेतकरी गेल्या 64 वर्षापासून शेतीच्या पाण्यासाठी प्रतीक्षेत असताना महायुतीचे सरकार पाणी देण्यासाठी प्रयत्नशील आहे.आ समाधान आवताडे, माजी आ प्रशांत परिचारक यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीअजित दादा पवार यांच्यामुळे येत्या काही दिवसात मंगळवेढ्यातील 24 गावाला पाणी देणार असल्याने मंगळवेढ्यातील जनतेला कर्नाटक मध्ये जाण्याची काही गरज भासणार नाही. तसेच स्टंटबाजी करणारे स्वयंघोषित शेतकऱ्यांचे कैवारी निवडणुकीच्या काळात आपले महत्त्व वाढवून घेण्यासाठी बहिष्काराची व कर्नाटकात जाण्याची भाषा करीत आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात पाण्याचा विषय काढणाऱ्यांनी थोडा धीर धरावा विद्यमान सरकार कडून येथील पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवला जाणार असल्याची माहिती असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन कार्यकारी जिल्हाअध्यक्ष रामेश्वर मासाळ यांनी दिली.
मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे त्यामुळे या भागात सध्या पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याची टंचाई जाणवत आहे.त्यामुळे सद्या या भागातील शेतकरी हवाल दिलं झाले आहेत.याभागातील पाणीप्रश्न कायमचा सुटण्यासाठी म्हणावे तेवढे प्रयत्न झाले नाहीत पाण्या वरून केवळ राजकारण झाले आहे परंतु सध्याचे सरकार हे महायुतीचे सरकार असून या सरकारमध्ये येथील पाणी प्रश्न सोडवण्याची धमक आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजितदादा पवार यांना येथील प्रश्नांची जाण असून ते या भागाला नक्कीच न्याय देतील. येथील आमदार समाधान आवताडे यांनी देखील विधानसभा पोट निवडणुकीनंतर या भागाला पाणी मिळावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आपण देखील येथील पाणी प्रश्नाबाबत पाठपुरावा करणार आहे.गेली पंधरा वर्षे गप्प असणारे काही विघ्नसंतोषी लोक निवडणूकीच्या तोंडावर बहिष्काराची व कर्नाटकात जाण्याची भाषा करून सरकार बद्दल विनाकारण असंतोष निर्माण करण्याची भाषा करीत आहेत. या लोकांनी केवळ निवडणुका समोर ठेवून आजपर्यंत पाण्याचे राजकारण केले आहे. त्यामुळे त्या स्वयंघोषित लोकांनी पाणी मिळणार आहे हे माहीत असून सुद्धा केवळ स्वार्थापोटी नसते उद्योग करू नयेत येत्या काही दिवसात मंगळवेड्याच्या 24 गावच्या पाणी योजनेसाठी निधी मिळणार असून केवळ महायुतीचे सरकार च निधी देवू शकते असे ही मासाळ यांनी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here