मंगळवेढा तालुाका मार्केट कमिटीची निवडणुकही समविचारी आघाडीच्या माध्यमातून लढविणार- भगीरथदादा भालके

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मंगळवेढा तालुक्यातील समविचारी नागरीक व कार्यकर्ते यांचे माध्यमातून श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणुक आपण मागील सहा-आठ महिन्यापूर्वी जिंकुन परिवर्तन घडविले आहे। तशाच प्रकारे जिल्हयाचे माजी आमदार माननीय प्रशांत परिचारक मालक, मंगळवेढा तालुक्यातील स्व।भारतनाना भालके प्रेमी नागरिक व कार्यकर्ते, तालुक्यातील विविध पक्षाचे, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येवुन समविचारी आघाडीचे माध्यमातुन मंगळवेढा तालुका मार्केट कमिटीची निवडणुक लढविल्यास आपण निश्चीतपणे जिंकु शकतो असा आत्मविश्वास युवकनेते व श्री विठठ्ल कारखान्याचे माजी चेअरमन श्री।भगिरथ भालके यांनी व्यक्त केला। समविचारी आघाडीचेवतीने मार्केट कमिटीचे निवडणुकी संदर्भात शिशुविहार येथे बोलावण्यात आलेल्या विचारविनिमय बैठकीचे प्रसंगी कार्यकत्याना मार्गदर्शन करताना ते बोलत होते।
सदर बैैठकीचे प्रसंगी बोलताना दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील म्हणाले की, तालुक्यातील शेतक-यांची सर्वात मोठी सहकारी संस्था असलेल्या दामाजी कारखान्याचा कारभार तालुक्यातील जनतेने विश्वास ठेवून समविचारीचे माध्यमातुन आमच्या ताब्यात दिला। दिलेल्या विश्वासाला पात्र राहून मालक म्हणुन काम न करता विश्वस्त म्हणुन काम केलेचे आपण सर्वानी जवळुन पाहिले आहे। कारखान्याचा कारभार काटकसरीने करुन ऊस उत्पादक शेतक-यांची ऊसबीले ३१ मार्च,२०२३ पूर्वी दिलेली आहेत। तसेच तोडणी वाहतुकीची बीले व कामगांचे पगारही वेळेत दिलेले आहेत। त्यामुळे आर्थिक वर्षाअखेरचे व्यवहार करणेसाठी सर्वाना सोयीचे झाले आहे। याचप्रमाणे तालुक्यातील शेतक-यांचे आर्थिक हितसंबध असलेली जिव्हाळयाची असणारी दुसरी संस्था मार्केट कमिटी असुन तीसुध्द्ा सर्वसामान्य शेतक-याच्या ताब्यात राहणे आवश्यक असलेने सक्षम उमेदवार उभे करुन ही निवडणुक समविचारी आघाडीच्या माध्यमातून सर्व शक्तीनिशी लढवुन जिंकण्याचे आवाहन उपस्थित कार्यकत्यांना केले।
श्री संत दामाजी कारखान्याचे निवडणुकीसाठी तयार केलेला समविचारी आघाडीचा पॅटर्न राज्यभर चर्चिला गेला आहे। त्याप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आपण योग्य व कार्यक्षम उमेदवार निश्चित करुन बाजार समितीची निवडणुक लढविणेसाठी तयार असलेचा निर्धार समविचारी आघाडीचे नेते अजित जगताप, संचालक औदुंबर वाडदेकर, लतीफ तांबोळी, युनूस शेख, गुलाब थोरबोले, उद्योजक कट्टे सर, ॲड।दत्तात्रय खडतरे, अॅड।संतोष माने आदींनी व्यक्त केला।
दामाजी कारखान्याचा पहिलाच हंगाम यशस्वीपणे पार पाडुन शेतक-यांची ऊसबीले,तोडणी वाहतुक ठेकेदारांची बीेले, कामगार पगार, व्यापारी देणी, हंगामासाठी मदत केलेल्या बँका पतसंस्थांची देणी वेळेत दिलेबद्दल याप्रसंगी समविचारी आघाडीचे नेते मा।श्री।भगिरथ भालके व मा।श्री।रामचंद्र वाकडे यांचे शुभहस्ते कारखान्याचे चेअरमन मा।श्री।शिवानंद पाटील व व्हा।चेअरमन मा।श्री। तानाजीभाऊ खरात यांचा सत्कार करण्यात आला।
या विचारविनियम बैठकीसाठी श्री संत दामाजी कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजीभाऊ खरात, समविचारी आघाडीचे नेते दामोदर देशमुख, रामचंद्र वाकडे, अरुण किल्लेदार, सोमनाथ माळी, चंद्रशेखर कोंडूभैरी, कारखान्याचे संचालक गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, दयानंद सोनगे, मुरलीधर दत्तू आदी यांचेसह मंगळवेढा शहरातील विविध संस्था व पक्षाचे पदाधिकारी, तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध कार्यकारी सह।सोसायटयांचे चेअरमन, व्हा।चेअरमन, सदस्य तसेच बहुसंख्य कार्यकर्ते व हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते।

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here