मंगळवेढा तालुक्यातील 35 गावच्या उपसासिंचन योजनेबाबत अभिजीत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन!  मंगळवेढ्याचा पाण्याचा प्रश्न सरकार दरबारी मांडल्याने नेते अभिजीत पाटील यांनी 35 गावच्या जनतेची जिंकली मने!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मंगळवेढा तालुक्यातील 35 गावच्या उपसासिंचन योजनेबाबत अभिजीत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन!

मंगळवेढा पाण्याचा प्रश्न सरकार दरबारी मांडल्याने नेते अभिजीत पाटील यांनी 35 गावच्या जनतेची जिंकली मने!

मंगळवेढा येथील ३५ गावातील उपसासिंचन योजनेबाबत त्रुटी पूर्ण करून भरघोस निधी उपलब्ध करण्याबाबत बैठक घेण्याची विनंती करणारे निवेदन मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांना १६ सप्टेंबर रोजी वर्षा बंगला, मुंबई येथे सादर केले व महत्त्वपूर्ण विषयांवर संवाद साधण्यात आला..

पंढरपूर – मंगळवेढा – सोलापूर जिल्हात पाऊस खुप कमी पडल्यामुळे दुष्काळ जाहीर करुन जनावरांसाठी चारा डेपो सुरु करावा, उजनी व वीर धरणातून नदी व कॅनल साठी पाणी सोडावी, वीज खंडीत करु नये, पिकांना व पर्यायाने शेतकऱ्यांना जीवनदान देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणेबाबत निवेदन सादर केले.

अनेक वर्षांपासून मंगळवेढातील ३५ गावांपैकी २४ गावांची उपसासिंचन योजना अंतिम टप्प्यात आहे. तरी उर्वरित गावे तांत्रिक बाबींमुळे शासनाच्या लाल फितीत अडकल्या आहेत. त्या योजनातील त्रुटी पूर्ण करण्यात याव्यात व मुबलक निधी मंजूर करावा असे निवेदन यावेळी दिले.

संतभूमी मंगळवेढ्यात महात्मा संत बसवेश्वर स्मारकासाठी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात अर्थसंकल्पात स्मारकाची घोषणा केली होती. परंतू अद्याप स्मारकास निधी उपलब्ध झालेला नाही. त्याबाबत निधी उपलब्ध करून तातडीने कामास सुरुवात करावी अशी विनंती देखील या निमित्ताने केली..

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here