भोगावती सहकारी साखर कारखान्यावरती भाजपच्या वतीने निवेदन सादर

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

(ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलातून शेअर्सची रक्कम, कापण्यात येऊ नये:-हंबीराव पाटील-हळदीकर)

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

आज दिनांक 10 /12 /21 रोजी भोगावती सहकारी साखर कारखान्यावरती करवीर व राधानगरी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करवीर तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष हंबीराव पाटील हळदीकर राधानगरी तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संभाजीराव आरडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले,ऊस उत्पादक सभासदांच्या बिलातून शेअर्सची रक्कम घेऊ नये, जवळजवळ 45 महिन्याची शेअरची साखर देणे आहे ती त्वरित द्यावी, कामगारांचे ९ ते १० महिन्याचे पगार देणे आहे ते द्यावे, तसेच कारखान्याचे संचालक मंडळ बेकायदेशीर जे नोकर भरती करत आहे ती त्वरित थांबवावी,पूर बाधित क्षेत्रातील ऊस प्राधान्याने न्यावेत तसेच कारखान्याचे ऊस तोड पाळीपत्रक हे कागदपत्री असून मनमानी पद्धतीने वशिल्याने ऊस तोड सुरू आहे त्यामुळे कारखान्याच्या सर्वसामान्य गरीब ऊस उत्पादक सभासदाचे प्रचंड हाल होत आहेत ते थांबवावेत या प्रमुख मागणीसाठी कारखान्याचे चेअरमन आमदार पी एन पाटील साहेब व्ह चेअरमन कार्यकारी संचालक सर्व संचालक मंडळ यांना देण्यात आले…यावेळी जिल्हा उपाध्यक्ष व्ही.टी जाधव,जिल्हा चिटणीस सुभाष जाधव,करवीर तालुका सरचिटणीस भोसले,राधानगरी सरचिटणीस संतोष कातीवले,शिवाजी सरवणे,सहकार जिल्हा उपाध्यक्ष महिपती पाटील,तालुका खजिनदार बी वाय लांबोरे, अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष एम आर पाटील,सांस्कृतीक जिल्हा आघाडी सुनील लिंगडे, इस्माईल जमादार, बंडोपंत भांदीगरे,नारायण लाड, संजय पवार, सदाशिव खडके,बळवंत किरूळकर, धोंडीराम देवाळकर,बाबुराव पाटील,संदीप बेंद्रे,सागर घोडगे,संजय नकाते,आनंदराव चौगुले, राजाराम चौगुले,आत्माराम पाटील, हरी सुतार,अमृत सुतार, निवृत्ती पाटील दिनकर पाटील,आनंदा लंबे,अमृत डांगे, प्रसाद पाटील, बापू चौगुले,संभाजी खाडे,प्रदीप पाटील,सदाशिव देवकुळे यांसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here