भीमा सह.साखर कारखान्याच्या चेअरमनपदी विश्वराज (भैय्या) महाडिक,तर व्हा चेअरमनपदि सतिश जगताप यांची निवड! कमी वयाचा सहकारातील महाराष्ट्रातील एकमेव तरूण म्हणजे विश्वराज महाडिक:खा.धनंजय महाडिक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आज मोहोळ तालुक्यातील एकमेव सहकारी साखर असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या आज पार पडलेल्या चेअरमन व व्हा.चेअरमन पदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाली. यामध्ये, आज, भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली.

यावेळी नुतन संचालक मंडळाच्या एकमताने चेअरमनपदी विश्वराज धनंजय महाडिक तर व्हा.चेअरमन पदासाठी पुनःच एकदा सतीश जगताप यांच्या नावाची खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक अधिकारी कुंदन भोळे यांनी घोषणा केली.यावेळी पुढे बोलताना खा.महाडिक म्हणाले की; कै.भिमराव (दादा) महाडिक यांच्यावर पंढरपूर, मोहोळ व मंगळवेढा तालुक्यातील जनतेने भरभरून प्रेम दिले त्याच प्रमाणे माझ्यावर प्रेम केले त्याच पद्धतीने महाडिकांच्या तिसऱ्या पिढीला देखील प्रेम द्यावे अशी भावना व्यक्त केली.

कमी वयाचा सहकारातील महाराष्ट्रात एकमेव तरूण म्हणजे विश्वराज महाडिक असेल परदेशातून शिक्षण पुर्ण करून थेट या क्षेत्रात येईल दिवस रात्र येथील माणसात रमेल वाटले नव्हते परंतु तो आला आणि ईथे काम करू लागला तरूणाईची मागणी नव्या व जुन्यांची सांगड घालून हा निर्णय घेतला.

राहीला प्रश्न विरोधकांचा तर येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करु तर पुढील काळात मी सोलापूर जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारायला तयार आहे असा मार्मिक टोला खा.धनंजय महाडिक यांनी लगावला

यावेळी भीमा परिवाराचे सर्वेसर्वा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक,सौ.अरुंधतीताई धनंजय महाडिक, पृथ्वीराज महाडिक, नुतन चेअरमन विश्वराज (भैय्या) महाडिक, विश्वास (भैय्या) महाडिक, पवन (भैय्या) महाडिक धनश्री परिवाराचे सर्वेसर्वा मा.शिवाजीराव काळुंगे सर,डिएमकेचे सुजीत (बापू) कदम, संघटक समन्वयक संग्राम (दादा) चव्हाण, सतिश जगताप,व भीमा सहकारी साखर कारखान्याचे सर्व नुतन संचालक, आधी सर्व कार्यक्षेत्रातील भीमा सहकारी साखर कारखान्यावर प्रेम करणारे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व सभासद कारखान्याचे कामगार या निवडी प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन पांडुरंग ताठे यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here