सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील प्रतिष्ठेच्या अशा भीमा सहकारी साखर कारखान्याचा “मिल रोलर पुजन”शनिवार दिनांक 13 ऑगस्ट 2012 सकाळी दहा वाजून 47 मिनिटांनी करण्याचे आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी नुतन राज्यसभा खासदार, व आपल्या भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय ऊर्फ मुन्नासाहेब भिमराव महाडिक, यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून हा कार्यक्रम कारखाना कार्यस्थळावर संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे यांनी दिली आहे.
तरी “मिल रोलर पूजन” कार्यक्रमास, सर्व खात्याचे अधिकारी, कर्मचारी, सर्व खाते प्रमुख व कामगार वर्ग आणि उपस्थित राहण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Home ताज्या-घडामोडी भीमा सहकारी साखर कारखान्याचा येत्या शनिवारी मिल रोलर पूजन (संसदरत्न खासदार धनंजय...