भीमा सहकारी साखर कारखाना रोलर पूजन उत्साहात संपन्न!! गळीत हंगाम योग्य व नियोजनबद्ध होईल; ६ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भीमा सहकारी साखर कारखाना लि; टाकळी सिकंदर, ता – मोहोळ, जि – सोलापूर या संस्थेच्या ४४ व्या गळीत हंगामाचा सन-२०२३-२४ साठीचा रोलर पूजनाचा कार्यक्रम भीमा परिवाराचे मार्गदर्शक तथा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांच्या शुभहस्ते बुधवार – दि.२८ जून रोजी सकाळी ११ वाजता कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला.

आगामी गळीत हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात चांगले पाऊसमान अपेक्षित असल्याने ऊसाची उपलबद्धता मोठ्या प्रमाणावर होईल असा अंदाज आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात कारखान्याचे किमान ६ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. यासाठी लागणारी ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणा, मशिनरी ओव्हरहॉलिंगसह दुरुस्तीची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. अनेक अडथळ्यांवर मात करत कारखान्याची वाटचाल चालु आहे. येणारा गळीत हंगाम योग्य व नियोजनबद्ध पद्धतीने सर्व संचालक मंडळ व आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी व्यक्त केला. कारखान्याकडे हंगामपूर्व कामे वेळेत पूर्ण करून कारखाना गळीत हंगाम लवकरात लवकर चालू करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी आपापल्या विभागाची कामे पूर्ण करावीत असे आवाहन त्यांनी केले.

सदर प्रसंगी मंगल ताई महाडिक, भीमा परिवाराचे नेते तथा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, सौ. अरुंधती महाडीक, पृथ्वीराज महाडिक, विराज महाडिक, कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश (आण्णा) जगताप, सर्व विद्यमान संचालक मंडळ, कार्यकारी संचालक एस. जे. शिंदे, अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने सभासद, शेतकरी, कार्यकर्ते, उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here