भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम साधारणतः तीन आठवड्यापूर्वी जाहीर करण्यात आला होता व येत्या सोमवारी दिनांक 18 जुलै 2022 रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख होती.व १९ जुलैला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे व चिन्ह वाटप करणे व दिनांक 31 जुलै रोजी मतदान तर १ ऑगस्ट रोजी याची मतमोजणी होणार होती पण सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होत असल्यामुळे व गेल्या दीड महिन्या मध्ये 89 व्यक्ती 181 प्राणी यांचा मृत्यू झाला असून या राज्यातील अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून यामध्ये २४९ गावे तर एकंदरीत १३६८ घरांची पडझड झाल्यामुळे हा सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याचे यावेळी महाराष्ट्र शासनाचा सहकार पणन वस्त्रोद्योग, विभाग, कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांनी जाहीर केला आहे राज्यातील संपूर्ण परिस्थिती जनजीवन वाहतूक व्यवस्था सुरळीत झाल्यानंतर तीस सप्टेंबर नंतर हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता असल्याचे या शासन आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. यामुळे ज्या काही सोलापूर जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या होत्या त्या संपूर्णपणे स्थगित करण्यात आल्या आहेत.
चौकट
मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असून यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. यामुळेच महाराष्ट्र शासन आदेशाप्रमाणे आम्ही ही निवडणूक थांबवीत आहोत व यानंतर येणाऱ्या शासन आदेशाची आम्ही वाट पाहून कारखान्याच्या निवडणुकीमध्ये संपूर्णपणे ताकदीने उतरू!
खा. धनंजय महाडिक
चेअरमन भीमा शुगर टाकळी सिकंदर