भीमा सभासद महाडीक साहेबांना एक्सपान्शन-कोजनची 100% ‘पोहोच पावती’ निश्चित देतील! -प्रा.संग्राम चव्हाण

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भीमा सभासद महाडीक साहेबांना एक्सपान्शन-कोजनची 100% ‘पोहोच पावती’ निश्चित देतील! -प्रा.संग्राम चव्हाण

सोलापूर जिल्हा  प्रतिनिधी

यंदाची भीमाची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असून गेल्या वीस वर्षापासून ‘ तू का मी ‘ या जुन्या संचालक मंडळाच्या वादामध्ये रखडलेले कारखान्याचे एक्सपान्शन व कोजनरेशन ह्या दोन्ही प्रकल्पाचे काम अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतूनही केवळ निवडणुक जाहीरनाम्या मधून स्वाभिभानी सभासदांना दिलेला शब्द खरा करून दाखवण्यासाठी कारखान्याचे चेअरमन धनंजय महाडिक यांनी भीमा बचाव संघर्ष समितीने वेळोवेळी राजकिय स्वार्थापोटी खोडकरपणे निर्माण केलेल्या विविध “अडथळ्यांची शर्यत” पार करत मोठ्या हिंम्मतीनं पूर्ण केले. अत्यंत शुद्ध व प्रामाणिक हेतू ठेवून भिमा सहकारी साखर कारखाना या आपल्या वडिलांनी ऊभारलेल्या संस्थेच्या विकासाच्या तसेच सभासदांना या ऊप-प्रकल्पातून मिळणाऱ्या जादा नफ्यातून सर्वोच्च ऊसदर देण्याच्या उदात्त हेतुने या दोन्ही प्रकल्पाच्या माध्यमातून उभा केलेल्या गौरवास्पद कामगिरीची अंतःकरणात जाणिव ठेवून आगामी निवडणुकीत भीमाचे सुज्ञ सभासद खा.धनंजय महाडिक यांना भविष्यात अत्यंत फायदशिर ठरणार्या या भरीव विकास कामाची 100% रास्त “पोहोच पावती” निश्चित दिल्याशिवाय राहणार नाहीत.

चाळीस वर्षांपूर्वी चारशे मैलावरून येऊन दूरदृष्टी ठेवून मोठ्या धाडसाने टाकळी सिकंदर परिसरात भीमा सहकारी साखर कारखाना काढून स्वर्गीय भीमरावदादा महाडिक यांनी या परिसरावर शतकोटी उपकार केले असून या भागाची वरदायनी ठरलेल्या भीमा कारखान्यामुळेच भागाचा कायापालट झाला व शेतकऱ्यांची खर्‍या अर्थाने प्रगती झाली हे भागात सर्वमान्य असून हे कधीही न फिटणारे ॠण आहे ही कृतज्ञतेची भावना प्रत्येक सभासद- शेतकऱ्यांच्या मनामनांत आजही कायम आहे व कायम तेवत राहील असे भावनिक उद्गार सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा भीमा परिवाराचे संघटक- समन्वयक प्रा.संग्राम चव्हाण यांनी आज माध्यमांशी बोलताना काढले.

सहकाराचे डॉक्टर स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनीही स्वाभिमानी सभासदांच्या ऊसाची ससेहोलपट होऊ नये म्हणून 1998 साली धनंजय महाडिक साहेबां- प्रमाणेच दूरदृष्टी ठेवून संस्थेबाबत आस्था दाखवत एक्सपान्शन चे काम पूर्ण केले होते याची आठवण व जाणिव भीमाच्या प्रत्येक सभासदाच्या मनामनांमधे आजही आहे व यापुढेही कायम राहील. राजकारण काहीही असो मात्र भीमा परिवार स्वर्गीय भिमराव दादा महाडिक यांच्या प्रमाणेच स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्याही अनंत उपकारांचे ओझ्याखाली कायम राहिल असेही भावनिक उद्गार भीमा परिवाराचे संघटक समन्वयक प्रा.संग्रामदादा चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना काढले.

चौकट

वेळ पडल्यास स्वतःची जमीन गहाण ठेवून थकित देणी देईन

संपूर्ण देशातील एकूण 732 साखर कारखान्यां पैकी 550 कारखाने भीमा कारखान्या प्रमाणे अडचणीत आले असून महाराष्ट्र सरकार सर्वच कारखान्यांच्या थकीत कर्जांचे पुनर्गठण करून तसेच कारखान्यांना पूर्वहंगामी कर्ज उपलब्ध करून देऊन अडचणींमधून मार्ग काढून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. स्वतंत्र सहकार खाते निर्माण करून केंद्र सरकार सुद्धा साखर कारखानदारी पुढील प्रश्न सोडवण्यासाठी पाऊले उचलत आहे.

भिमा सहकारी कारखान्याच्या माझ्या सभासद व कामगार बंधूंनी कारखान्या समोरील अडचणी समजून घेऊन थकित पैशांसाठी दीर्घकाळ संयम दाखवला.याची मला जाणीव आहे. लवकरच आम्ही सर्व थकित देणे द्यायची व्यवस्था करत आहोत व वेळ पडल्यास स्वतःच्या कुटुंबाची जमीन गहाण ठेवून सभासद व कामगारांची पै ना पै चुकती करण्यासाठी मी शेवटपर्यंत कटिबद्ध आहे.

(खा.धनंजय महाडीक, चेअरमन,भीमा स.सा. कारखाना तथा कोऑर्डिनेटर केंद्र-राज्य सहकारी व खाजगी साखर कारखाने).

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here