(पंढरपूर, मंगळवेढा व मोहोळ तालुक्यातील सर्व उमेदवारांना भीमा परिवार ताकत देणार.)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
मोहोळ, पंढरपुर, व मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये भीमा परिवार व युवाशक्ती यांची मोर्चेबांधणी सुरू असून या माध्यमातून, त्यांनी जोरदार तयारी सुरू केली असल्याचे खात्रीलायक वृत्त असून संपूर्ण भीमा परिवार व महाडिक युवाशक्ती या निवडणुकीसाठी मैदानात उतरणार असल्याचे समर्थकांमधून बोलले जात आहे.
याचबरोबर नव्याने कार्यक्षेत्रात असलेल्या बऱ्याचशा ग्रामपंचायती वरती भीमा व लोकशक्ती परिवाराच्या गटाचे वर्चस्व आहे.
त्याचबरोबर मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पाच गट झाले असल्यामुळे, या तालुक्यातील गटांमध्ये सुद्धा भीमा व युवाशक्ती परिवाराची चांगली ताकद आहे. मोहोळ तालुक्यातील विद्यमान कुरुल गटातील जिल्हा परिषद सदस्य हे भीमा व लोकशक्ती परिवाराचे असून या तालुक्यात सुद्धा हायवेच्या अलीकडचा भागात संपूर्णपणे भीमा व लोकशक्ती परिवाराचे वर्चस्व आहे. पूर्वीचा मोहोळ तालुक्यातील इतिहास पाहता येथील दोन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मोहोळ पंचायत समितीसाठी भीमा व लोकशक्ती परिवाराची भूमिका निर्णायक ठरली होती त्याचबरोबर 2016 च्या निवडणुकीमध्ये भीमा व लोकशक्ती परिवाराचा उपसभापती या पंचायत समितीमध्ये मध्ये विराजमान झाला होता. तसेच सद्यस्थितीला सोलापूर जिल्हा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज दादा डोंगरे यांचीही ताकद भीमा परिवाराला मिळणार आहे.
त्याचबरोबर समविचारी आघाड्यांबरोबर गटांमध्ये व गणांमध्ये त्यांना सोबत घेऊन भीमा व लोकशक्ती परिवार आगामी निवडणूका लढविणार असल्याचे चांगले संकेत दिसते आहेत.
यामध्ये भीमा परिवाराने 2006 -2007 साली स्व.आ.भारतनाना भालके यांचे पुतणे व्यंकटराव आण्णा भालके यांच्यापाठीमागे भीमा व युवाशक्ती परिवाराची मोठी ताकत उभा केली होती तर 2011 ते 2016 संतोष प्रक्षाळे यांना निवडूण आणण्यामध्ये भीमा-विठ्ठल-चंद्रभागा आघाडीची मोठी ताकत होती, त्याचबरोबर 2016साली कुरूल जिल्हा परिषद गटात सौ.गोडसे यांना सुध्दा निवडूण आणण्यामध्ये व भीमा परिवार व युवाशक्तीने मोठी भूमिका बजावली होती तसेच सध्यास्थितीला भीमा परिवारातील सदस्य निवडूण आले. या तीनही टर्मला बाहेरील उमेदवारामागे भीमा व लोकशक्ती, युवाशक्ती परिवाराची ताकत उभा केली होती.
सध्या तरी ‘पुळूज’ हा हक्काचा जिल्हा परिषद गट झाल्याने भीमा परिवारातील सर्व नवतरूण युवक व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे ह्यावेळेस पुळूज गटामधून ‘भीमा परिवारातीलच उमेदवार’असावा असे काही जेष्ठ नेतेमंडळी व समर्थकांच्या चर्चेतून दिसून येत आहे. सध्या तरी जिल्हा परिषद गटात आरक्षण कोणते पडले नसून या गटात आरक्षण ओपन पडावे यासाठी समर्थकांकडून देव पाण्यात ठेवल्याचे चित्र दिसत आहे.
चौकट-
‘पुळूज’ जिल्हा परिषद गटामधून उमेदवारीसाठी ‘भीमा परिवारातील पवनभैय्या महाडिक’ यांचे नाव सर्व नेतेमंडळीं व नवतरुण समर्थकांमधून चर्चिले जात असल्याचेही दिसते आहे. त्याचबरोबर भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक हे भारतीय जनता पार्टीमध्ये असल्यामुळे त्याचबरोबर, सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सद्यस्थितीला भारतीय जनता पार्टीची सत्ता असून इथून पुढील काळातही भाजपची सत्ता आणण्यामध्ये भीमा परिवाराची महत्त्वपूर्ण भूमिका ठरणार असून या तीन तालुक्यांमध्ये भीमा परिवार हा “किंगमेकर” ची भूमिका पार पडणार आहे असे ग्रामीण भागातील प्रत्येक गावोगावच्या ज्येष्ठ नागरिकांनामधून चर्चिले जात आहे
परंतू जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या गटामध्ये व पंचायत समिती गणामध्ये कसे कोणत्या प्रकारे आरक्षण पडते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असले तरी आरक्षण पडल्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होईल.