भीमा नदीवर अजनसोंड-मुंढेवाडी येथे पूल बांधणे व देगाव-अजनसोंड-मुंढेवाडी-अनवली याठिकाणी रिंगरोड करणेसाठी माजी आमदार परिचारक यांची बांधकाम मंत्री चव्हाण यांच्याकडे मागणी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भीमा नदीवर अजनसोंड-मुंढेवाडी येथे पूल बांधणे व देगाव-अजनसोंड-मुंढेवाडी-अनवली याठिकाणी रिंगरोड करणेसाठी माजी आमदार परिचारक यांची बांधकाम मंत्री चव्हाण यांच्याकडे मागणी

तीर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये भरणाऱ्या चार प्रमुख यात्रा काळात तसेच शेतीपूरक मालवाहतुकीसाठी तालुक्यातील भीमा नदीपात्रावर अजनसोंड ते मुंढेवाडी भिमानदीवर पुल बांधावा व देगाव-अजनसोंड-मुंढेवाडी-अनवली असा रिंगरोड व्हावा अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.श्री.रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्याकडे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी केली.

पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड ते मुंढेवाडी भिमानदीवर पुल बांधणे व रिंगरोड केल्यास त्या भागातील शेतकऱ्यांची ऊसाची वाहतुक, शेतमालाची वाहतूक, अन्य कृषी उत्पादने व शेतीपुरक मालाचे विक्रीसाठी दैनंदिन वाहतुक सुलभ होणार आहे. तसेच तीर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये मोठ्या प्रमाणात चार मोठ्या वाऱ्या भरतात. यावेळी भाविकांची मोठी गर्दी असते. त्यावेळी शहरातील वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे स्थानिक नागरिक, शेतकरी, भाविक यांची सोय होण्याकरीता भिमानदीवर पुल बांधणे व रिंगरोड करणे गरजेचे असल्याचे प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले.

पंढरपूर शहरालगत वाखरी ते देगाव व वाखरी ते लक्ष्मी टाकळी या रिंगरोडचे (बायपास) रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत काम सुरू आहे. परंतू अनवली ते मुंढेवाडी व देगाव ते अजनसोंड ह्या रिंगरोडचे काम अद्याप पर्यंत पुर्ण झालेले नाही. परंतु भविष्यात हा रिंग रोड करणे गरजेचे आहे. या रस्त्यावरील अजनसोंड ते मुंढेवाडी पुलाचे काम व रिंगरोडचे काम झाल्यास वारी काळात या रस्त्याचा वापर होणार आहे. तसेच सुस्ते – देगाव – शेगावदुमाला – अजनसोंड – मुंढेवाडी – कोंढारकी – अनवली यापरिसरातील नागरिकांना या पुलाचा वाहतुकीसाठी व शेतीमालाच्या वाहतुकीस उपयोग होणार आहे. तसेच अहमदनगर – बार्शी – कुर्डुवाडी – सोलापूर – विजापूर – कोल्हापूर – सांगली याभागातून येणाऱ्या लांब पल्यांच्या वाहतुकीसाठी हा पर्यायी मार्ग म्हणून उपलब्ध होणार असून वाहतुक कोंडीचा अडथळा दुर होणार आहे.

त्याअनुषंगाने सार्वजनिक बांधकाममंत्री मा.ना.श्री.रविंद्र चव्हाण यांचेकडे भिमानदीवर अजनसोंड ते मुंढेवाडी पुल बांधणेसाठी व देगाव ते अजनसोंड – मुंढेवाडी ते अनवली रिंगरोडचे काम पुर्ण केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजनेमधून मंजूरी मिळावी यासाठी लेखी निवेदनाव्दारे मागणी केली असल्याची महिती मा.आ.प्रशांत परिचारक यांनी सांगितले. यावर सार्वजनिक बांधकाममंत्री यांनी सकारात्मकता दर्शविली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here