त्यामुळे गेले दोन वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे प्रलंबित असलेल्या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता असून प्रारुप मतदार याद्या अंतिम झाल्यानंतर राज्य सहकारी प्राधिकरण कार्यालय पुणे यांच्याकडून, या निवडणुकांच्या सर्व तारखा प्रसिद्ध करण्यात येतील अशी अधिकृत माहिती आमच्या मीडिया सेलकडे मिळाले असून त्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या सहकारी साखर कारखाने व इतर तत्सम सहकारी संस्थांच्या निवडणुका आता या होणार असल्याबाबत माहिती मिळत आहे.
चौकट
आज निवडणूक प्राधिकरण कार्यालयकडून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होणार असल्यामुळे सर्व सभासद शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे त्याचबरोबर उद्या दिनांक 30 एप्रिल 2012 रोजी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची ऑनलाईन सर्वसाधारण सभा असल्यामुळे या सभेकडे सर्व पंढरपूर तालुक्यातील 28 हजार सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.