भीमा,जकराया,लोकमंगल आदी कारखाने बंद पडावे यासाठी विरोधकांकडून षडयंत्र केले गेले: उमेश(दादा) पाटील

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

ज्या भागातील जनतेने मतरूपात आशिर्वाद दिला त्यांना विकासकामांपासून वंचित राहावे लागत आहे:उमेश(दादा) पाटील

 

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

पेनुर जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश दादा पाटील यांच्या तांबोळे, अंकोली येथील जनता दरबाराला नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती..

यावेळी उमेशदादा पाटील बोलताना म्हणाले की; तालुक्यातील जनतेने मतरूपात आशिर्वाद दिला त्यांना विकासकामांपासून वंचित राहावे लागत आहे. तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांची चुल बंद पडावी म्हणून भीमा, जकराया, लोकमंगल आदी कारखाने बंद पडावे यासाठी विरोधकांकडून षडयंत्र केले गेले. विरोध हा तालूक्याला ३०-३५ वर्षे विकासापासुन वंचित ठेवणा-याला आहे. जनतेच्या अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव तुमच्यासोबत आहे त्यासाठी हा जनता दरबार असून या जनता दरबाराचे उद्दिष्ट सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकरी यांचे प्रश्न शासन दरबारा पर्यंत सोडवण्यासाठी मी सदैव तुमच्यासोबत असल्याचे प्रतिपादन यावेळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते तसेच जिल्हा परिषद सदस्य उमेश दादा पाटील यांनी तांबोळी अंकोली वरकुटे शेजबाभुळगाव याठिकाणी केले.

नागरिकांनी कधी ही आमच्याकडे संपर्क साधावा त्या अडचणी सोडविण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला जाईल असे यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी मोहोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती मानाजी बापू माने, मोहोळचे मा.नगराध्यक्ष रमेश बारसकर,अशोकतात्या क्षिरसागर, संभाजी नाना कोकाटे, भीमाचे माजी संचालक प्रकाशनाना बचुटे, टाकळी सिकंदरचे युवा नेते विकील दमन चव्हाण, अक्षय गायकवाड, आदी मान्यवर,कार्यकर्ते,शेतकरी उपस्थित होते.

चौकट
हा जनता दरबार म्हणजे नेत्यांचा नसून सर्वसामान्य जनतेचा असून नेत्यांनी सर्व सामान्य जनतेकडे जायचे असते. जनतेने नेत्यांकडे जायचे नसते नेता हा फक्त काम करण्यासाठी असतो स्वतःच्या प्रपंचाला उभारी देण्यासाठी तालुक्यामध्ये अनेकांनी अनेक संस्था डबघाईला आणल्या. त्यांना पुढील भविष्यकाळातील निवडणुकीमध्ये सर्व मतदार घरी बसतील

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here