“भीमा”च्या 500 कामगारांचे लसीकरण संपन्न.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

“भीमा”च्या 500 कामगारांचे लसीकरण संपन्न.

धनंजय महाडिक यांचा स्वखर्चातुन उपक्रम

 

सोलापूर // प्रतिनिधी

मोहोळ तालुक्यातील राजकीय राजधानी समजल्या जाणार्या भीमा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आज दि 31 जुलै २०२१ रोजी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर
भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन संसदरत्न मा. खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना साहेब महाडिक यांच्या स्वंयमप्रेरणेतून व स्वखर्चातून कारखान्याच्या सर्व कामगारांसाठी मोफत कोविशिल्ड लसीकरण शिबीर संपन्न झाले.याप्रसंगी स्व.भीमरावदादा महाडिक यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा.सतीशअण्णा जगताप व भीमा सहकारी साखर कारखान्याचे संघटक-समन्वयक मा.प्रा.संग्रामदादा चव्हाण, कारखान्याचे कार्यकारी संचालक मा.सुर्यकांत शिंदे यांच्या शुभहस्ते करून शिबिराला सुरुवात झाली.

यावेळी बोलताना प्रा. संग्राम चव्हाण म्हणाले,” कोरोना पासून बचाव करण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग व
सॅनीटायझर या प्रतिबंधात्मक ‘त्रिसूत्री’ बरोबरच ॲन्टिकोविड लस हा एक प्रभावी उपाय असून आज कारखान्याचे चेअरमन संसदरत्न खासदार धनंजय महाडिक यांनी स्वखर्चातून आयोजित केलेल्या या लसीकरण शिबिराचा सर्व कामगारांनी लाभ घ्यावा

 

“महाडिक साहेबांचे कर्तव्यभावनेतून शिबिर”,“लवकरच गोड बातमी”
ॲन्टिकोविड लसीचा देशभर तुटवडा असून भिमाच्या प्रत्येक कामगाराच्या आरोग्याचे व हिताचे रक्षण करणे हे संचालक मंडळ तसेच चेअरमन यांचे कर्तव्य असून याच भावनेतून चेअरमन श्री.धनंजय महाडिक यांनी स्वखर्चातून या  ‘मेगॅ व्हॅक्सिनेशन कँप’ चे आयोजन केले आहे.
हे शिबिर म्हणजे एक स्तुत्य उपक्रम असून
‘भिमाच्या कामगारांना चेअरमन साहेबांनी वाऱ्यावर सोडून दिले आहे ‘असा होणारा आरोप चुकीचा असल्याचे द्योतक आहे. लवकरच सभासद व कामगार यांचे थकीत देणे संपूर्णपणे ‘फुल ॲन्ड फायनल’ अदा करण्याची गोड बातमी येणार असून सभासद व कामगारांनी कारखान्या पुढील अडचणी समजून घेऊन जो संयम दाखवला आहे त्याबद्दल चेअरमनसाहेब संचालक मंडळ मनस्वी आभारी आहेत.
(प्रा.संग्रामदादा चव्हाण,
संघटक-समन्वयक,भीमा परिवार).

——————————————————————-

सर्व कामगारांनी लस घ्या
शासन पातळीवर कोविशिल्ड लसीचा तुटवडा असल्यामुळे लसीकरणास विलंब होत असून भीमा कारखान्याची यंदाच्या हंगामाची तांत्रिक तयारी पूर्ण करण्यासाठी कामगारांना कारखान्यामधे एकत्र काम करत असताना एकमेकांच्या सतत संपर्कात यावे लागते. कामगारांचे कोरोनापासून रक्षण व्हावे यासाठी कारखान्याचे चेअरमन श्री.धनंजय महाडिक साहेब यांनी स्वखर्चातून लसीकरण शिबिर आयोजित केले असून कारखान्यातील सर्व कामगारांनी एकाच वेळी लसीकरणाचा लाभ घ्यावा व आपले व आपल्या कुटुंबियांचे कोरोना पासून संरक्षण करावे.
(श्री सतीश अण्णा जगताप, व्हाईस चेअरमन भीमा सहकारी साखर कारखाना)
या कार्यक्रमासाठी कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीशआण्णा जगताप, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, संग्रामदादा चव्हाण, जनसंपर्क अधिकारी बंडू साहेब शेख, संचालक सिद्राम आप्पा मदने, याच बरोबर कारखान्याचे ऑफिस सुपरिटेंडेंट भाऊसाहेब जगताप,चिफ इंजिनीअर आसबे,डॉ.गुंड, कारखान्याचे संचालक मंडळ, सर्व अधिकारी,कर्मचारी व कामगार वृंद यावेळी उपस्थित होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here