भीमाच्या विरोधी राजकिय शक्तींचा गोकुळमधील हस्तक्षेप गोकुळच्या सभासदांनी सहन केला असता का?महाडिक साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे ऊभा-भारत पाटील

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

45 वर्षांपूर्वी धाडस व दूरदृष्टी दाखवून स्व. भीमरावदादा महाडिक यांनी पुळुज – टाकळी सिकंदर शिवेवर भीमा कारखाना उभा केला.या कारखान्यामुळे या भागाचं सोनं झालं. त्यावेळी स्व. भिमरावदादांनी ह्या परिसरात कारखाना काढला नसता तर तो आजपर्यंत कुणीच काढला नसता हे एक वास्तव असून आजचे सोन्याचे दिवसही पहावयास मिळाले नसते.स्व.परिचारक यांनीही हा कारखाना चांगला चालवून दाखवला. भीमा कार्यस्थळावर त्यांचा पुतळा उभा करण्याचा ठराव घेऊन त्यांच्याविषयीची मनातील आदर भावनाच व्यक्त केली असून भीमा कारखान्याची धुरा सभासदांनी एकमताने व विश्वासाने स्व.भीमराव दादांचे सुपुत्र संसदरत्न खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे सोपवली. श्री. धनंजय महाडिक यांनी स्वर्गीय भिमरावदादा महाडिक यांनी उभा केलेल्या त्याच जुन्या कारखान्या शेजारी नवा दुप्पट क्षमतेचा कारखाना व 10 नव्हे तर तब्बल 25 मेगॅवॅटचा विद्युत निर्मिती प्रकल्प तसेच शैक्षणिक परिसराची निर्मिती करून सभासदांनी विश्वासाने केलेली त्यांची निवड सार्थ ठरवत थकित ऊस बिलांचा प्रश्नही 100% मार्गी लावला. कामगारांच्या थकीत वेतनासाठी प्रश्नही सोडवित आणला.मात्र गेल्या दीड वर्षांच्या कालावधीमध्ये विरोधकांनी कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील व खासदार संजय मंडलिक यांना हाताशी धरून सरकारकडून आर्थिक मदत व बँकांकडून अर्थसाहाय्य होऊ नये यासाठी स्वतःच्या सहीने तक्रारी दिल्या.परिणामी भिमाच्या सभासदांना ऊस बिल मिळण्यास खूप विलंब लागला. गेला हंगामही सूरू होऊ नये यासाठी बचाव समितीने तक्रारी देऊन आडकाठी आणली होती. बचाव समितीची ही नकारात्मक भूमिका म्हणजे “मुॅह मे राम और बगल मे छुरी” अशीच आहे. गोडाउन मध्ये कोट्यवधी रुपयांची साखर शिल्लक असताना केवळ बचाव समितीच्या दुराग्रहामुळे व सत्ता हव्यासापोटी उचललेल्या चुकीच्या व विसंगत तक्रारीच्या पावल्यामुळे भिमाच्या सभासदांना व चेअरमन धनंजय महाडिक यांना खूप मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले,हंगाम लांबला. आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सत्तेसाठी काहीही करायला तयार असणार्या बचाव समितीच्या या सदस्यांना भीमा कारखाना बंद पाडावयाचा आहे काय?मी असा खडा सवाल करतो कि *भीमा कारखान्याच्या विरोधी शक्तींनी जर सोलापूर जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात जाऊन गोकुळ मध्ये हस्तक्षेप केला असता तर तो हस्तक्षेप गोकुळच्या सभासदांनी सहन केला असता का? मग भिमाच्या स्वाभिभानी सभासदांनी कोल्हापूरकरांचा आपल्या भीमाविषयी कसलाही संबंध नसताना हस्तक्षेप का सहन करावा? राज्याच्या मंत्रिमंडळात व्यापक जनहितासाठी काम करत असताना आमदार सतेज पाटील व खासदार संजय मंडलिक यांनी भीमा विरोधात उचललेले तक्रारीचे पाऊल हे सभासदांचे खुप नुकसान करून गेले असून या हस्तक्षेपाचे कुठल्याच पातळीवर समर्थन होऊ शकत नाही. त्यांनी याठिकाणी आदरणीय शरद पवार यांच्यासारखा प्रगल्भ दृष्टीकोण दाखवण्याची गरज होती. सरकार कडून मिळणारी मदत रोखण्याचे व कुठल्याही बँकेचे कर्ज मिळू न देण्याचा कुटिल डाव बचाव समिती कडून आखण्यात आला तसेच बँकेचे कर्ज मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये वारंवार अडसर निर्माण करून सभासद व कामगारांच्या अन्नात माती कालविणार्या या मनोविकृत प्रवृत्तींचा भिमाच्या 22 हजार सभासदांच्या वतीने निषेध करतो.

भीमा कारखान्याचा खऱ्या अर्थानं मनापासून आस्था ठेवून विकास करणाऱ्या व संपूर्ण पुळुजला तसेच भीमा परिवाराला स्वताःचे कुटुंब मानून प्रेम व आपुलकी देणार्या मुन्नासाहेबांच्या पाठीशी आम्ही सर्व 22 हजार सभासद खंबीरपणे उभे राहू” असे भावोद्गार पुळुज येथील धनंजय महाडिक यांचे निकटवर्तीय समजले जाणारे व भीमराव महाडिक पतसंस्थेचे चेअरमन श्री.भारत पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना काढले.यावेळी भीमा परिवाराचे धनंजय महाडिक युवाशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. धनंजय देशमुख,पुळुजचे माजी सरपंच किसनराव जाधव,विठ्ठलचे माजी संचालक राजेंद्र बाबर, संचालक माणिक बाबर भीमा परिवाराचे प्रवक्ते पांडुरंग ताटे,पुळुजचे सरपंच शिवाजी शेंडगे,जाकिर मुलानी,श्री. कोरे ,समीर ताटे डॉ. शैलेश बाबर,संजय खरात,पैलवान अन्सार भाई शेख,पत्रकार बंडू बाबर,पै.प्रमोद बाबर,इंटक अध्यक्ष महादेवआबा बाबर,पै.रामा चव्हाण, पै.रमेश बाबर,पै.समाधान लोमटे,ऊद्गोजक गोपाळ बाबर, पं. स.पै.चंद्रकात होनकळस, संदिप देवकते,भाऊसाहेब पाटील अमोल ताटे महेश कांबळे संतोष कांबळे,धनाजी सर्जे,श्री.ढोणे,सतीश बाबर,श्री.हनुमंत गोरे इतर मान्यवर उपस्थित होते.

चौकट-

कोल्हापूरचे राजकारण कोल्हापुरात अन् सोलापूरचं सोलापूरात ठेवा

ज्यांचा या कारखान्याशी काहीही संबंध नाही त्यांनी जिल्ह्याबाहेरुन येऊन भीमाच्या कारभारात केलेली हि ढवळाढवळ भीमाच्या एकाही सभासदाला रूचलेली नाही. सभासदांच्या मनात प्रचंड राग साठलेला असून कोल्हापूर चं राजकारण कोल्हापूरात ठेवावं व सोलापूरचं सोलापूरात! भिमाच्या कारभारात बाह्य शक्तींची ढवळाढवळ आम्ही सहन करणार नाही!* *संपूर्ण राज्यातील साखर कारखानदारी संकटातून पुढे जात असताना शेतकरी कफल्लक झालेला असताना अशा प्रकारची अमानुष कारवाई करून कोल्हापूरकरांनी भिमाच्या सभासदांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

ही भळभळणारी जखम भीमाच्या सभासदांच्या चिरकाळ मनात टोचत राहिल व भीमाचे सभासद येणाऱ्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये याचे सडेतोड ऊत्तर देतील.प्रसंगी हातात 265 जातीच्या ऊसाचा बुडखा घ्यावा लागला तर बेहत्तर पण अपप्रवृत्तींचा काळ सोकाऊ देणार नाही.
(श्री.भारत पाटील, चेअरमन भीमराव महाडिक पतसंस्था)

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here