सोलापूर जिल्ह्यातील रंगतदार ठरलेली निवडणूक म्हणजे टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक.
या निवडणुकीत सत्ताधारी व त्यांचे पारंपारिक विरोधक हे सोमोर होते नेहमी प्रमाणे आरोप प्रत्यारोप हे चालूच होते या निवडणुकीत सगळ्यात वेगळं फॅक्टर म्हणजे कै.भिमरावदादा महाडिक यांची तिसरी पिढी
कारखान्याच्या निवडणुकीत विश्वराज महाडिक यांचे नान खणखणीत चालले आणि वाजले सुद्धा उच्च शिक्षित आणि बोस्टन टू शेतकरी बांध असा त्यांचा प्रवास आहे. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर विश्वराज महाडिक यांनी ऊस परिसंवाद याच्या माध्यमातून ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जावून समस्या जाणल्या व सोडविल्या आणि तिथुनच महाडिक यांची तिसरी पिढी राजकारण व समाजकारणात सक्रिय होऊ लागली.
अशातच कै.भिमरावदादा महाडिक यांनी स्थापन केलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजले.त्यानंतर या निवडणुकीची धुरा विश्वराज महाडिक यांनी हातात घेतली आणि तरूण सहकार्यांना सोबत घेऊन त्यांनी आपले विचार आणि शेतकऱ्यांसाठी काय घेऊन येणार याबाबत चर्चा थेट शेतकऱ्यांशी केली आणि सुरूवातीपासूनच विश्वराज महाडिक यांनी प्रचारात आघाडी घेतली होती यांचा चांगलाच फायदा भिमा परिवाराला झाला.
निकाल हाती आल्यानंतर आता लक्ष लागले ते चेअरमन व व्हा चेअरमन कोण? होणार याकडे येत्या गुरुवारी २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११वाजता जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी मा.कुंदन भोळे यांनी नुतन संचालक मंडळाची बैठक कारखाना कार्यस्थळावर बोलावली असून यावेळी नुतन चेअरमन आणि व्हा.चेअरमन पदाची निवड होणार आहे.
यामध्ये सुज्ञ सभासद वर्गातून व तरूणांमधून चेअरमन विश्वराज महाडिक हेच होणार? असल्याचे समजते आहे. या बैठकीपुर्वी भिमा परिवाराचे सर्वेसर्वा खासदार धनंजय महाडिक हे सर्व नुतन संचालक मंडळाशी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे.