भिमा बचाव संघर्ष समिती शरद पवार साहेबांपेक्षा श्रेष्ठ आहे का? संग्राम चव्हाण

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भिमा बचाव संघर्ष समिती शरद पवार साहेबांपेक्षा श्रेष्ठ आहे का? संग्राम चव्हाण

 

सोलापूर // प्रतिनिधी

भीमा बचाव संघर्ष समितीच्या सदस्यांनी सोशल मीडियावर कागदोपत्री पुरावे अस- ल्याचा पोकळ दावा करत असून ते टाकळी सिकंदर चौकामध्ये चर्चेला खुले आव्हान देत आहेत.परंतु गेल्या पंचवार्षिक निवडणुक प्रचारातही ह्या मंडळीकडे हे सर्व पुरावे होते

असाच त्यांचा दावा होता व खुल्या व्यासपीठांवरून खालच्या पातळीला जाऊन याच पद्धतीने आरोप केले जात होते.तरीही भीमाच्या सभासदांनी सूज्ञपणेच मतदान केले.जर भक्कम पुरावे होते तर मग संस्थेबद्दल खोटा पुळका असणाऱ्या ह्या मंडळींनी सक्षम न्यायालयामध्ये दाद का मागितली नाही? आणि आज टाकळी सिकंदर चौकात चहाच्या टपरीवर व पानाच्या टपरीवर बोलवून खुल्या चर्चेचे आव्हान देत आहेत.त्यांच्या या आव्हानाला भीमा कारखान्याच्या सभासदांचे
उत्तर पुरे आहे!

साखर कारखाना चालवणे म्हणजे पिठाची गिरणी चालवणे नव्हे! जो कारखाना उपपदार्थ निर्मिती करेल तोच कारखाना टिकेल ही बाब सहकाराचे डॉक्टर असणारे स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या ध्यानात आली होती व दूरदृष्टी दाखवत त्यांनी 25 वर्षांपूर्वी कारखान्याचे विस्तारीकर-ण व सह विद्युत निर्मिती प्रकल्पाचे नियोजन केले.परंतु त्यावेळच्या संचालक मंडळामधील “आम्ही का तुम्ही” या मतभेदांमुळे हे दोन्ही प्रकल्प रखडले.व भीमाच्या स्वाभिमानी सभासदांना त्याची किंमत मोजावी लागली. ‘माझा ऊस न्या हो’असं म्हणत इतर कारखानदारांच्या पुढे लाचार व्हावे लागले. सन 1995 मध्ये त्यांनी कारखान्यांची गाळप क्षमता 1250 मेट्रिक टन वरून 2500 मॅट्रीक टनावर वर नेली.त्यासाठी त्यांना पंचवीस वर्षांपूर्वी दहा कोटी रुपये खर्च आला होता.आजही स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्याप्रमाणेच दूरदृष्टी दाखवत भीमाचे चेअरमन श्री.धनंजय उर्फ मुन्ना साहेब महाडिक व विद्यमान संचालक मंडळ यांनी मोठ्या हिम्मतीने विस्तारीकरण व सहविद्युत निर्मिती प्रकल्प पूर्ण केला. सदर प्रकल्पपूर्ती कोणीतरी करणं सभासदांसाठी काळाची गरज होती.1995 मध्ये पेट्रोल 10 रु /प्रती लिटर होते पण महागाईमुळे आज ते 110 रु/प्रती लिटर कडे चालले.प्रकल्पांची किंमत वाढली व्याजांचा ताण आला. शेतकऱ्यांचा जाणता राजा शरद पवार साहेबांच्या एवढा अनुभव, ज्ञान व प्रगल्भ दृष्टिकोन भीमा बचाव संघर्ष समितीच्या सदस्यांकडे आहे का? हे भिमाचे सभासदच ठरवतील.भारत देशातील साखर कारखानदारी पुढे निर्माण झालेल्या समस्या एवढ्या गंभीर आहेत की त्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या भरीव आर्थिक मदतीशिवाय ते सुटूच शकत नाहीत ही वस्तुस्थिती असताना भीमा बचाव समितीच्या काही नादान नकारात्मक प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकार कडून भीमा कारखान्याला आर्थिक मदत मिळू नये यासाठी निवेदन देऊन प्रयत्न केले गेले. परंतु 20 हजार सभासदांचे हित लक्षात घेऊन प्रगाढ अनुभव असलेल्या शरद पवार साहेबांनी असल्या “राजकीय हेतूने” प्रेरित अशा निवेदनाला केराची टोपली दाखवली! फटकारलेसुद्धा! व भीमा कारखान्याला वीस कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजुर केली.त्यामुळे यंदाचा गळीत हंगाम यशस्वी ठरला अन्यथा यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरूच होऊ शकला नसता. याचे गंभीर परिणाम कारखान्याला, सभासदांना, ऊसवाहतूकदारांना, तोडणी मजुरांना तसेच या परिसरातील व्यावसायिकांना भोगावे लागले असते. कारण कार्यक्षेत्रातील 50 गावांची अर्थव्यवस्था भीमा कारखान्याच्या आर्थिक उलाढालीवर अवलंबून आहे. याचे भान सत्तेमध्ये येण्यासाठी बेभान आणि उतावीळ झालेल्या बचाव समितीच्या सदस्यांना राहिलेले दिसत नाही.राजकारणामध्ये काही वेळा काही गोष्टी साध्य करण्यासाठी “अटी मान्य नसलेल्या तहावर ” सही करावी लागते. भीमाचे चेअरमन श्री.धनंजय उर्फ मुन्ना साहेब महाडिक यांनीही भाजपमध्ये प्रवेश करून सुद्धा राजकीय आकस मनात न ठेवता सभासदांचे हित लक्षात घेऊन प्रचंड राजकीय प्रगल्भतेचे दर्शन घडवत आदरणीय शरद पवार साहेबांनी बचाव समितीच्या अपरिपक्व निवेदनाला केराची टोपली दाखवत भीमा कारखाना ला आर्थिक मदत मिळवून दिली. सोहाळ-कोथाळं भागात उगम पावलेल्या बचाव समितीचं डोकं ठिकाणावर आहे का? ते स्वता:ला शरद पवार साहेबांपेक्षा श्रेष्ठ समजत आहेत का? अशी उद्विग्न प्रतिक्रिया भीमा परिवाराचे संघटक समन्वयक
प्रा.संग्राम चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here