भिमा बचाओ संघर्ष समिती म्हणजे फक्त सभासदांची दिशाभूल! – प्रा.संग्राम चव्हाण

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भिमा बचाओ संघर्ष समिती म्हणजे फक्त सभासदांची दिशाभूल! – प्रा.संग्राम चव्हाण

सोलापूर // प्रतिनिधी

भीमा बचाव संघर्ष समिती चा हेतू शुद्ध व प्रामाणिक नसून भिमा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची ही फक्त दिशाभूल व फसवणूक आहे.”मुॅह में राम और बगल मे छूरी” या उक्तीप्रमाणे मनामध्ये राजकीय स्वार्थ व संस्थे च्या विकासाबाबत मात्र खोटा पुळका अशा प्रकारची “कहीं पे निगाहे कहीं पे निशाना”अशी दुटप्पी भूमिका घेऊन अस्तित्वात आलेल्या या भिमा बचाव संघर्ष समितीला भीमा कारखान्याचे सुज्ञ सभासद चाणाक्षपणे ओळखून त्यांचा हा कुटील डाव ते उधळून लावल्या शिवाय राहणार नाहीत.

एखाद्या संस्थेमध्ये जर भ्रष्टाचार खूप बोकाळला असेल व त्या संस्थेचे संचालक मंडळ संस्था विकासाला व सभासदांच्या हिताला प्राधान्य न देता जर नुकसानकारक निर्णय घेत असेल व संस्था दिवाळखोरीच्या मार्गावर असेल,संस्थेमध्ये अनागोंदी माजली असेल तरच अशा प्रकारच्या “संस्था बचाओ” संघर्ष समिती स्थापन करण्याची गरज निर्माण होत असते. परंतु भीमा सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत तशी कोणतीच परिस्थिती निर्माण झाली नसून, भीमा कुठंही बुडायला लागला नसून ऊलट बहुप्रतिक्षित असे कारखाना विस्तारीकरण, सहविद्युत निर्मिती प्रकल्प, सभासदांच्या मुलांसाठी आधुनिक शैक्षणिक संकुल ही उल्लेखनीय विकास कामे श्री.धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने पूर्ण केली आहेत. ठिबक सिंचनासाठी अर्थसहाय्य, शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरलेल्या 265 जातीच्या ऊसलागवडीला परवानगी,अतिरिक्त उसाच्या वेळी मालकतोड करण्यासाठी ॲडव्हान्स ची तरतूद वगैरे तसेच लवकरच इथेनॉल-डिस्टिलरी ऊभारणीचे सभासदांच्या हिताचे अत्यंत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. सदर ठिबकचे कर्ज घेतल्यानंतर बर्‍याचशा सभासदांनी बाहेरील कारखान्यास ऊस घातल्यामुळे सदर कर्ज वसुल होऊ शकले नाही व अतिरिक्त व्याजाचा बोजा वाढला. एक्सपाॅन्शन व कोजनरेशन प्रकल्प उभा करण्यासाठी जे कर्ज घेतले त्या कर्जाच्या व्याजाचाही प्रचंड ताण संस्थेवर आला. एकूण दहा गाळप हंगामात पैकी तीनच हंगाम हे पूर्ण म्हणजे 150 दिवसांचे हंगाम झाले तर सात हंगाम अर्धवट कालावधी चे ठरले त्यामुळे ते हंगाम तोट्याचे ठरले.शेवटच्या महिन्यातील काही शेतकऱ्यांची ऊस बिले थकली आहेत.तसेच कामगारांचे काही पगार थकले. ही वस्तुस्थिती असून हि थकीत देणी देण्यासाठी निधी उभा करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. लवकरच हि थकीत देणी संपूर्णपणे अदा करण्यात येतील. शेतकऱ्यांना द्यावी लागणारी एफ्आरपी, होणारा उत्पादन खर्च व बाजारपेठेत मिळणारा साखरेचा भाव, केंद्रसरकारचे चुकीचे आयात-निर्यात धोरण यांचा कुठेही ताळमेळ बसत नसल्यामुळे संपूर्ण देशातील कारखानदारी अडचणीत आली असून ही वस्तुस्थिती सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी समजावून घेतली पाहिजे. भीमा कारखान्याच्या सुज्ञ सभासदांनी ही वस्तुस्थिती ती समजून घेतली असून यंदा पार पडलेल्या हंगामात आपला ऊस गाळपास पाठवून विद्यमान संचालक मंडळावरील विश्वासच जणू व्यक्त केला आहे.भीमा कारखाना या संस्थेवरील विश्वासार्हता कायम आहे अन्यथा एकाही शेतकऱ्याने यंदा गाळपास ऊस पाठवलाच नसता. त्यामळे भीमा तालुक्यातील दुसऱ्या फळीतील काही स्वार्थी विचारांच्या,नकारात्मक प्रवृत्तीच्या व्यक्तिंनी एकत्र येऊन स्वार्थी हेतूने जी ‘भिमा बचाव संघर्ष समिती’ स्थापन केली गेलेली आहे व ज्या समितीचा उगम ” सोहाळे-कोथाळे” भागातून झाला आहे अशा कुठल्याही समितीची आज तरी गरज नाही.या समितीचा हेतू शुद्ध किंवा प्रामाणिक आहे कि केवळ पूर्वग्रहदूषित राजकिय,महत्वकांक्षेपोटी व केवळ स्वार्थासाठी हि बचाव समिती स्थापन केली गेली हे भीमाचा सभासदराजा ठरवेलच. ह्याच नकारात्मक प्रवृत्तीच्या मंडळींनी भीमा कारखाना अडचणीतून जात असताना सुद्धा एम. एस.सी.बँकेकडून मिळणार्‍या पूर्व हंगाम कर्जासाठी राज्य शासनाकडून मिळणारी थकहमी मिळू नये यासाठी प्रयत्न केले होते.त्यामुळे अशी शासनाची थकहमी मिळाली नसती तर यंदाचा सीझन फेल झाला असता व कारखाना आणखी अडचणीत गेला असता.नवीन ऊप प्रकल्प उभा करण्यासाठी लागणारे भाग भांडवल कारखाना शेअर्सविक्रीच्या माध्यमातून उभा करत असतो. परंतु हे नवीन सभासद रद्द करण्यासाठी याच मंडळींनी प्रयत्नांची शिकस्त करून भाग भांडवल उभारणी मध्ये अडथळा निर्माण केला. परिणामी संस्था आणखी अडचणीत गेली असती. म्हणजे या मंडळीचे भीमा संस्थेविषयीचे प्रेम बेगडी व फसवे आहे हेच सिद्ध होते.

चौकट:-

(10 वर्षापूर्वी ज्या मंडळींनी त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अशीच भिमा बचाव संघर्ष समिती स्थापन केली होती. आताही त्याच मंडळींनी विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भिमा बचाव संघर्ष समितीची स्थापना केल्यामुळे या बचाव समितीला जनाधार कितपत मिळेल हे सांगणे कठीण आहे.राष्ट्रवादीच्या अनगरकर पाटलांना चारशे मैलावरील काँग्रेसच्या कोल्हापूरकर पाटलांच्या समितीने देऊ केलेले सहकार्य रुचेल का?भा.ज.पा.च्या पंढरपूरकरांना नक्की काय मान्य होईल? पेनुरकरांसोबत लंगोट बांधून मैदानात उतरलेले राष्ट्रवादीचे नरखेडकर पाटील नक्की कोणा बरोबर कुस्ती धरणार? चिंचोलीकर पाटील कोणाच्या पारड्यात ओझे टाकणार? पुळुजकर व सुस्तेकरांना बरोबर घेऊन वाड्यावरचे पंढरपूरकर नक्की कोणता निशाणा साधणार? की कोल्हापूरचे भाजपचे दादा पुळुज चे ‘शेड’ व पंढरपुर चा ‘वाडा’ यांचा कसा मेळ घालणार? भीमा परिवारासाठी अत्यंत महत्वाची ठरू शकणारी सर्वपक्षीय वज्रमूठ आणखी मजबूत होणार का? गेल्या पंचवार्षिक प्रमाणे महाडिक शेडवरून काही जुन्या अंतर्गत गटबाजी करणा-या पदाधिका-याना थांबविण्यात येईल का? व नवीन को-यापाटीच्या,धडाडीच्या निष्ठावंत चेहऱ्यांना संधी दिली जाणार का? या सर्व प्रश्नांची उकल झाल्यावरच भीमा कारखान्याच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे)

  • परंतु आता मात्र भीमा कारखान्याची गाडी रुळावर आली आहे. भीमा सहकारी साखर कारखाना म्हणजे स्व. भिमराव दादा महाडिक यांनी या परिसराला दिलेली एक “अमूल्य भेट” आहे. भीमा कारखाना ही टाकळी सिकंदर पंचक्रोशीची आन-बान- शान असून ही संस्था म्हणजे या परिसराची अस्मिता आहे. भीमा कारखान्याच्या प्रगतीसाठी आम्ही सर्व सभासद एकजुटीनं राहू अशी  प्रतिक्रिया भीमा कारखान्याचा सर्व सभासद शेतक-यांमधून उमटत आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here