भाविकांना वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज वैद्यकीय अधिक्षक -डॉ.अरविंद गिराम

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पाच ठिकाणी लसीकरण केंद्र; केंद्रावर भाविकांनाही सुविधा मिळणार

 

पंढरपूर दि.11:- कार्तिकी यात्रेमध्ये पंढरपूरात येणारे भाविक आरोग्यसंपन्न रहावे. तसेच यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना उत्कृष्ट व दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. त्याचबरोबर भाविकांच्या सुविधेसाठी लसीकरण केंद्रे देखिल उभा करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद गिराम यांनी दिली.

कार्तिकी यात्रेच्या कालावधीत आरोग्याची आवश्यक काळजी घेण्यासाठी वैद्यकीय उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिका आरोग्य विभाग तसेच जिल्हा परिषद तालुका आरोग्य विभाग या सर्वांच्या वतीने शहरात ठिकठिकाणी तसेच शहर परिसरातील ग्रामीण भागातही आरोग्य यंत्रणा उभी करण्यात आली आहे. यामध्ये यात्रा कालावधीत उभारण्यात आलेल्या सहा आपत्कालीन मदत केंद्रावर औषधोपचार व प्रथमोपचार केंद्रे उभारण्यात आली आहेत. यामध्ये चंद्रभागा वाळवंट, पत्राशेड , 65 एकर परिसर, पोलीस संकुल, भक्तनिवास, संसर्गजन्य रुग्णालय आणि गोपाळपुर अशाचा समावेश आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या दर्शन मंडप याठिकाणी पाच बेड्स सह संपूर्ण आरोग्य यंत्रणा रुग्णासआरोग्यसेवा देण्यास तत्पर आहे. तसेच शहरात ठिकठीकाणी रुग्णवाहिका तत्पर आहेत. गर्दीच्या आणि आरोग्य सेवा देण्यासाठी दुचाकी रुग्णवाहिका तयार करण्यात आले आहेत. तर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन बेड, आयसीयू , स्वतंत्र कोरोना रुग्ण विभाग तयार करण्यात आला आहे. तसेच एक फिरते वैद्यकीय पथक नेमण्यात आले असल्याचे डॉ.गिराम यांनी सांगितले.

यात्रेच्या पार्श्वभुमीवर लसीकरण केंद्रेही उभा करण्यात आली आहेत. लोकमान्य विद्यालय, 65 एकर, नगरपालिका शाळा नंबर 7 ,गोपाळपूर, नागरी आरोग्य केंद्र या ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे. तसेच लसीकरणाबाबत जनजागृतीही केली जाणार आहे. असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी सांगितले

आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करुन भाविकांनी यात्रा पार पाडावी. तसेच लसीकरण मोहिमेस देखील उस्फूर्त प्रतिसाद द्यावा. असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here