भारत राष्ट्र समिती पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या आदेशाने 86-नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये 51 हजार सदस्य नोंदणी अभियान ला जोरदार प्रतिसाद मिळत आहे
एक महिना आहे हे अभियान नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये चालणार असून याच दरम्यान नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात “दहा कोर कमिट्या” स्थापन करण्यात येणार असल्याचे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा समन्वयक प्रवीण अण्णा जेठेवाड यांनी सांगितले
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेने नांदेड मधील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी व शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी लढण्यासाठी ब्राह्मण, मराठा, राजपूत, बंजारा, दलित,आदिवासी,ओबीसी, अल्पसंख्यांक, व सर्व गरीब समाजाच्या हक्कासाठी प्रत्यक्ष राजकारणामध्ये प्रवेश करावा व देशाचे व शेतकऱ्यांचे महान नेते “धरती पुत्र” के.चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षांमध्ये प्रवेश करावा, असे आव्हान प्रवीण अण्णा जेठेवाड यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केले आहे.
येत्या पाच दिवसांमध्ये नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा कोर कमिटीची स्थापना होणार असून यामध्ये प्रामुख्याने पक्षाची 1) पार्टी मुख्य कोर कमिटी 2)भारत राष्ट्र किसान समिती 3)भारत राष्ट्र युवक समिती 4)भारत राष्ट्र विद्यार्थी समिती 5)भारत राष्ट्र महिला समिती 6)भारत राष्ट्र एस.सी.समिती 7)भारत राष्ट्र एस.टी.समिती 8)भारत राष्ट्र ओ.बी.सी.समिती 9)भारत राष्ट्र अल्पसंख्याक समिती 10)भारत राष्ट्र कामगार समिती ची स्थापना करण्यात येणार आहे व सर्वात अगोदर प्रत्येक समितीच्या विधानसभा अध्यक्षाची नेमणूक करून त्याची नोंद पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष के.चंद्रशेखर राव यांना मराठवाडा विभागीय समन्वयक यांच्या द्वारे देण्यात येणार आहे त्यामुळे ज्यांना वरील कमिट्यांमध्ये अध्यक्षपदावर काम करायचे आहे. त्यांनी आपला अर्ज प्रवीण अण्णा जेठेवाड यांच्याकडे सादर करावा असे आवाहन केले आहे.
पत्ता: भारत राष्ट्र समिती नांदेड जिल्हा मध्यवर्ती कार्यालय,मयूर मंगल कार्यालय नाईक नगर नांदेड 431605 मो. नं. 7276093001
घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकारणाविषयी अत्यंत महत्त्वाचे विधान केले होते, समाजातील शोषित,वंचित, पीडित,मागासवर्गीय,गोरगरीब कष्टकरी लोकांचे प्रश्न सोडवायचे असेल तर बुद्धिजीवी लोकांनी प्रत्यक्ष राजकारणामध्ये प्रवेश करून लोकशाही वाचवावी. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी व सेवक असलेले के. चंद्रशेखर राव यांनी जगातील सर्वात उंच डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तेलंगणा राज्यातील हैदराबाद सचिवालय समोर उभा केला आहे. त्याचबरोबर तेलंगणा राज्याचे सचिवालयाचे नाव डॉ बाबासाहेब आंबेडकर सचिवालय तेलंगणा राज्य असे ठेवले आहे.
त्यामुळे लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी भारत राष्ट्र समिती या पक्षांमध्ये सामील व्हावे,असे आव्हान नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा समन्वयक प्रवीण अण्णा जेठेवाड यांनी जनतेला केले आहे