भाजपाच्या वतीने पंढरपूरात चक्काजाम आंदोलनाचे आयोजन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर // प्रतिनिधी 

राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मराठा समाजास आरक्षण मिळाले नाही. ओबीसी चे राजकीय आरक्षण रद्द झाले तर  मागासवर्गीयांचे नोकरीमध्ये आरक्षण धोक्यात आले आहे. याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवार दि.२६/०६/२०२१ रोजी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.
             पंढरपूर शहरामध्ये सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
या राज्य सरकारने मराठा समाजाची बाजू व्यवस्थीत न मांडल्यामुळे सुप्रिम कोर्टात त्यांचे आरक्षण रद्द झाले. तर राज्यातील ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण ही सुप्रिम कोर्टात रद्द झाले. यामुळे राज्यातील १२ बलुतेदार १८ पगड जमातीचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील नेतृत्व संपुष्टात येणार आहे. ओबीसी समाजाची सुप्रिम कोर्टात व्यवस्थीत बाजू न मांडल्यामुळे देशातील फक्त महाराष्ट्रातील ओबीसीचे आरक्षण कोर्टान रद्द केले आहे. मागासवर्गीचे नोकरीतील पद्दोन्नती आरक्षण रद्द झाले आहे. या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी राज्य सरकारला जागे करण्यासाठी शनिवार दि.२६/०६/२०२१ रोजी जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर मध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रा.सुभाष मस्के, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष यांनी यावेळी दिली.
 
यावेळी भाजपा किसान मोर्चाचे राज्य कोषाध्यक्ष माऊली हळणवर, भाजपा भटक्या विमुक्त सेलचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण धनवडे,  तालुका अध्यक्ष भास्कर कसगावडे, शहराध्यक्ष विक्रम शिरसट, भाजपा जिल्हा सरचिटणीस बालदसिंह ठाकुर, भाजपा सेलचे विविध पदाधिकारी यावेळी उपस्थिती होते.
 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here