भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे बंधू राष्ट्रवादीच्या गोठ्यात

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे बंधू राष्ट्रवादीच्या गोठ्यात

हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का; प्रशांत पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश

 

भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू प्रशांत पाटील यांनी पुणे येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे.

प्रशांत पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने बावड्या मध्ये राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. याचा बावडा परिसरातील आणि एकूणच इंदापूर तालुक्यातील आगामी राजकारणावर खूप मोठा परिणाम होणार आहे. प्रशांत पाटील हे इंदापूर तालुक्यातील राजकारण- समाजकारणातील एक बडे प्रस्थ असून त्यांनी विविध स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सहकारी संस्थांवर काम केले आहे. प्रशासनाचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. बावडा लाखेवाडी जिल्हापरिषद गटांमध्ये प्रशांत पाटलांना मानणारे अनेक कार्यकर्ते असून या भागात त्यांची ताकद चांगल्या प्रमाणावर आहे.

प्रशांत पाटील हे इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती होते.आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत.तसेच सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका होणार आहेत.याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होईल असे राजकिय जाणकारांचे मत आहे.

या प्रवेशा नंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असून तालुका राष्ट्रवादीमय करणार असे वक्तव्य प्रशांत पाटील यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here