भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची मळमळ वेगळीच – श्रीकांत शिंदे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
स्वत:चे अपयश झाकण्यासाठीच पालकमंत्र्यांवर केली टीका; राष्ट्रवादी युवकचे जोरदार प्रत्युत्तर
पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील सुरज जाधव आत्महत्या प्रकरणात जो शासकीय अहवाल प्राप्त झाला त्या अहवालात सुरज जाधवने आत्महत्या करताना पुन्हा शेतकरी जन्म नको म्हणत व्हिडीओ बनवून आत्महत्या केली त्यावर अनेक राजकीय मंडळींनी त्या व्हिडीओचा आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापर करून महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. पण सत्य पाहता सुरज जाधव यांच्या मृत्यु अहवालातून शेतीतून आणि दूग्धव्यवसायातुन उत्पन्न मिळत नसल्याने या निराशे पोटी जीवन संपवण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले आहे, असे निदर्शनास येते. त्याचे नावावर कोणतेही वीज कनेक्शन नसून, महावितरणने त्याचे कोणतेही वीज कनेक्शन कट करण्यात आले नाही असे अहवालात दिसून येते. मात्र या गोष्टीचे जोरदारपणे राजकारण करण्याचे काम सध्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून केले जात आहे ही दुर्दैवी बाब आहे. मात्र ज्यांना दोन इंदापूर तालुक्याने नाकारले असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे नुकतेच पंढरपूर तालुक्यात येवून गेले त्यांनी याबाबत आपले स्थानिक प्रतिस्पर्धी तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका करून आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न केलेला आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सचिव श्रीकांत शिंदे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर केलेला आहे.
वास्तविक पाहता मुळात भारतीय जनता पार्टीने वीज कनेक्शन तोडल्यामुळे सुरज जाधव यांनी आत्महत्या केली असा बनाव केला व या आत्महत्या प्रकरणाला राजकीय दिशा देण्यात आली. जो जगाचा पोशिंदा आहे त्या शेतकरी राजाने आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलणे योग्य नसून सुरज बाबत झालेली घटना ही दुदैवी आहे. त्यागोष्टीचे समर्थन राष्ट्रवादी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही कधीच करणार नाही.  आत्महत्या करून प्रश्न सुटत नसतात त्यामुळे राज्यातील कोणत्याही शेतकऱ्याने असे टोकाचे पाऊल उचलू नये अशी विनंती आम्ही करीत आहोत. परवा इंदापूरचे माजी आमदार व माजी सहकार मंत्री यांनी सुरज जाधवच्या कुटूंबियांना मदत करत असताना त्यांनी सुरज जाधवच्या मृत्युचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडले खरे, ज्या हर्षवर्धन पाटलांनी सहकार मंत्री असताना इंदापूर तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या आंदोलनात कोकाटे नामक शेतकरी टायर फोडत असताना त्याचा मृत्यु झाला त्या शेतकरी कुटुंबाला सहकार मंत्री असताना आपण मदत देवू शकला नाहीत, त्यामुळे नरूटेवाडी गावाने आपणास गाव बंदी केली ही वस्तूस्थिती तुम्ही नाकारून केवळ आपले विरोधक सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्या द्वेषापोटी आपण सोलापूर जिल्ह्यात येवुन राजकारणाच्या गप्पा मारून गेलात. 
विशेष म्हणजे आजपर्यंत ज्या कॉंग्रेस पक्षामुळे आपण मंत्रीपदे भोगले व राज्यात नावलौकिक मिळविला त्याच्या विरोधातील विचार सरणी असलेल्या भाजपामध्ये सध्या आपण असल्यामुळेच आपल्याला ते त्यांच्याप्रमाणे काम करणे आवश्यक आहे हे आम्ही समजू शकतो मात्र पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे केवळ संबंधित कुटूंबाला भेट देवून सांत्वन करायला आले नाहीत याचे भांडवण करून  येणाऱ्या निवडणूकांआधी केवळ शेतकरी हिताचे नावाखाली आपण त्यांना कोंडीत पकडण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे त्यात तुम्हाला कधीही यश मिळणार नाही म्हणूनच दोन वेळा आपल्याला जनतेने नाकारलेले आहे, याचा विचार केलेला बरा अशी खरमरीत टीका श्रीकांत शिंदे यांनी हर्षवर्धन पाटलांवर केलेली आहे.
खरं तर आपल्याला व आपल्या भारतीय जनता पार्टीला कायमच मृत्युच्या घटनेबद्दल राजकारण करायची सवय ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची मळमळ समजु शकतो असा टोला राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सचिव श्रीकांत शिंदे यांनी हर्षवर्धन पाटील यांना लगावला आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here