भाजपा युवक नेते प्रणव परिचारक यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भाजपा युवक नेते प्रणव परिचारक यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले

जिल्हाचे नेते मा.आ.प्रशांत मालक परिचारक यांच्या माध्यमातून “बूथ सशक्तिकरण अभियान” अंतर्गत आज भाजपा पंढरपूर शहर, तालुक्यातील बूथ प्रमुखांची आढावा बैठक पश्चिम-महाराष्ट्र संघटन मंत्री मा.मकरंदजी देशपांडे यांच्या सह भाजपा युवक नेते मा.प्रणव मालक परिचारक आणि विधानपरिषद आमदार मा.रणजितसिंह मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

 

यावेळी आपण सर्वांनी मतदार संघातील तळागाळातील सामान्य नागरिकापर्यंत पोहचून त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून द्यावा. तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी आपले बूथ मजबूत करावे, असे आवाहन भाजपा नेते प्रणव परिचारक यांनी व्यक्त केले.

 

भाजपा पंढरपूर शहर प्रभारी अक्षय वाडकर यांनी या बैठकीस उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून आभार प्रदर्शन देखील केले.

 

याप्रसंगी जेष्ठ कार्यकर्ता सेल प्रदेशअध्यक्ष सुरेश खिस्ते, तालुका अध्यक्ष भास्करदादा कसगावडे, शहराध्यक्ष विक्रम शिरसट, अनु.जा मोर्चा जिल्हाध्यक्ष चांगदेव कांबळे, जि.उपाध्यक्ष सुभाष मस्के, संदिपजी माने, आणि किसान मोर्चाचे प्रदेश चिटणीस माऊली हळनवर, युवा मोर्चा अध्यक्ष लाला पाणकर, बादलसिंह ठाकूर, महिला अध्यक्षा डॉ.प्राजक्ता बेनारे यांच्या सह जेष्ठ मार्गदर्शक तरूण सहकारी मित्र, पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here