(विदुल अधटराव यांचा स्तुत्य उपक्रम)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सौ.चित्राताई किशोर वाघ, यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा युवा मोर्चा मा शहराध्यक्ष, विदुल अधटराव यांनी, नारीशक्ती सप्ताहाचे आयोजन केले आहे यामध्ये त्यांनी शुक्रवार दिनांक 11 ते 17 फेब्रुवारी २०२२ पासून विविध उपक्रम राबवले आहेत यामध्ये,
शुक्रवार दि. 11/2/2022 – कडाक्याची थंडी लक्षात घेता बेवारस व बेघर लोकांना मायाची उब म्हणून ब्लँकेट वाटप
शनिवार दि. 12/2/2022 – नवरंगे बालकाश्रम पंढरपूर येथील मुलींना सॅनिटरी पॅड चे वाटप
रविवार दि. 13/2/2022 – गरजेचा प्रवास करणेसाठी नियमानुसार मोफत कोरोना लस सर्टिफिकेट व युनिव्हर्सल पास वाटप
सोमवार दि. 14/2/2020 – वारंवार येणाऱ्या कोरोनाच्या लाटेचे गांभीर्य व वीना मास्क दंडात्मक कारवाई रोखण्यासाठी मोफत मास्क वाटप
मंगळवार दि.15/2/2022 – वय वर्ष 15 ते 18 वयोगटातील लहान मुला मुलींकरिता व 18 च्या पुढील वयोगटातील महिला व पुरुषांकरिता पहिला व दुसरा डोस
बुधवार दि. 16/2/2022 – आदरणीय चित्राताई वाघ यांना दीर्घायुष्य व शक्ती लाभो म्हणून भारताची दक्षिण काशी असणाऱ्या आणि महाराष्ट्रातील प्रत्येकाचे श्रद्धास्थान असणाऱ्या पांडुरंगाला (मूर्तीला) दुग्धाभिषेक नामदेव येथे
गुरुवार दि. 17/2/2022 – लहान मुलांना लेखन व वाचनाची गोडी लागावी म्हणून वाचन-लेखन साहित्याचे वाटप, देशभक्ती आदी सर्व कार्यक्रमाचे यावेळी आयोजन करण्यात आले असून यामध्ये सन्मित्र ग्रुप पंढरपूर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पंढरपूर तसेच नियोजन समितीमध्ये प्रशांत मधुकर धुमाळ निलेश विजय लकेरी विजय प्रकाश दहीवडे, सतीश अंबादास सासवडकर आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते परिश्रम घेणार असल्याचे यावेळी संयोजक विदुल अधटराव यांनी सांगितले.