भाजपा पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने 43 वा भाजपा स्थापना दिवस साजरा!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस देशभर, राज्यातही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने पक्षाचा 43 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी पक्षासाठी योगदान दिलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा, पदाधिकारी यांचा सन्मान मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना परिचारक म्हणाले 6 एप्रिल 1980 पक्षाच्या स्थापनेपासून प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्यासाठी त्यांचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी सर्वत्र प्रयत्न करत आहे. तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला प्रतिनिधीत्व करण्याची संधी देण्याचे काम भारतीय जनता पार्टी करत आहे.

भाजपाचा सामाजिक विचारांचा वारसा हा असाच अखंडपणे सुरू राहिल, कुशल जिद्दी व संयमी कार्यकर्त्यांच्या जोरावर पक्षाने आपले आजचे हे स्थान मिळवले असल्याचे तसेच देशाला आधुनिक आणि जागतिक महासत्ता बनवण्याचे दिशेने भाजपा आहोरात्र काम करत असल्याचे सांगितले व भारतीय जनता पक्षाच्या 43 व्या स्थापना दिनानिमित्त मा.आ.प्रशांतराव परिचारक यांनी कार्यक्रर्त्यांना व पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या आहे.

प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी आणि शेवटी स्वतः अशी भारतीय जनता पक्षाची विचारधारा असल्याचे सांगत पंढरपूर भाजपा प्रभारी श्री.अक्षय वाडकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या 43 व्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी युवक नेते प्रणव परिचारक, तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, शहराध्यक्ष विक्रम शिरसट, ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश खिस्ते, शिरीष कटेकर, ॲड.प्रकाश कुलकर्णी, मा.नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, भाजपा.अ.जा.मोर्चा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण धनवडे, दि.पंढरपूर अर्बन बँक चेअरमन सतिशजी मुळे, अनिल अभंगराव, सुभाष मस्के, संदिप माने, माऊली हळणवर, प्रशांत देशमुख, हरी गांवधरे, बादलसिंह ठाकुर, अनंत कटप, युवा मोर्चा शहराध्यक्ष लाला पानकर, भाऊ टमटम, संदिप कळसुळे, पार्थ बेणारे, ओंकार जोशी, संग्राम परदेशी, हर्षल कदम, विष्णु सुरवसे, राहुल परचंडे, धर्मराज घोडके, तमित इनामदार, राजु सत्तारमेकर, नवनाथ रानगट, तुकाराम चव्हाण, अपर्णा तारके, सुचिता सगर, कल्पना शिंगटे, रेखा कुलकर्णी आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here