भाजपा, अ. जा. मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया प्रमुख संजीव खिलारे यांची सोलापूर जिल्हा प्रभारी पदी नियुक्ती.‌

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भाजपा, अ. जा. मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया प्रमुख संजीव खिलारे यांची सोलापूर जिल्हा प्रभारी पदी नियुक्ती.‌

 

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया प्रमुख पदाची महत्त्वाची जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी नुकतीच सोपवली असताना पुन्हा संजीव खिलारे यांची अ.जा. मोर्चा सोलापूर जिल्हा ग्रामीणच्या ” प्रभारी ” पदी निवड केल्याचे पत्र अ. जा. मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधाकरराव भालेराव यांनी नुकतेच दिले आहे. यावेळी भाजपा मोहोळचे मा. तालुका अध्यक्ष सतिश आप्पा काळे, सुरेश उर्फ पिंटू राऊत सर् उपस्थित होते.
संजीव खिलारे यांची ओळख सामाजिक प्रश्र्नांची जाण असलेले अभ्यासू , लढावू व आक्रमक बाण्याचे कार्यकर्ते म्हणून त्यांची विशेष ओळख असून ते गेल्या चार वर्षांपासून भाजपा मध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. समाजातील सर्वसामान्य, उपेक्षित, कष्टकरी जनतेच्या न्याय्य प्रश्नावर सतत उपोशने, आंदोलने, मोर्चे काढून वंचीतांना नेहमीच त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी “माझ्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यावर पक्ष श्रेष्ठींनी फार मोठा विश्वास टाकला असून जाज्वल्य देशभक्ती, प्रत्येकाच्या गुणवत्तेला प्राधान्य आणि प्रत्येकाला संधीची समान उपलब्धी करून देण्याची पक्षाची भुमिका यामुळे युवकांमध्ये भारतीय जनता पार्टी चे संघटन अधिक लोकप्रिय होत आहे. भारतीय जनता पार्टीचे विचार सोलापूर जिल्ह्यातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षाचे संघटन अधिक गतिमान व मजबूत करु!” असा विश्वास संजीव खिलारे यांनी व्यक्त केला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here