भाजपाचे नुतन जिल्हाध्यक्ष,आ.सचिन दादा कल्याणशेट्टी,यांचा उद्या जंगी सत्कार समारंभ!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भारतीय जनता पार्टीचे नूतन जिल्हाध्यक्ष आमदार श्री सचिन दादा कल्याण शेट्टी यांचा प्रथमच, मोहोळ तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असून यावेळी मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे वतीने त्यांचे जंगी स्वागत व सत्कार समारंभ करण्यात येणार आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टी मोहोळचे शहराध्यक्ष सुशील भैया क्षीरसागर यांनी दिली. या कार्यक्रमास सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराज दादा डोंगरे लोकसेवक संजय आण्णा क्षीरसागर, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष शंकरराव वाघमारे, त्याचबरोबर संपूर्ण मोहोळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी युवा मोर्चाचे पदाधिकारी सर्व सदस्य सर्व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष युवा नेते सुनील दादा चव्हाण यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here