भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा राजीनामा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर दिनांक १२ जुलै .भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे अडचणीत आले असून यापूर्वी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी एका महिलेविरोधात मुंबई येथे हनीट्रॅपची केस दाखल केली होती. त्याच महिलेने आज आपल्या बेडरूम मधून स्वतःहून व्हिडिओ व्हायरल केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर श्रीकांत देशमुख यांनी तात्काळ सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे दिला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या आदेशाने सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा तात्पुरता पगार सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे मुंबई येथील कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी एक प्रसिद्धी पत्र काढले आहे..

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here