केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाने शाह यांच्या या दौऱ्याला सुरुवात होईल. त्यानंतर ते प्रवरानगर इथल्या देशातल्या पहिल्या सहकारी परिषद आणि शेतकरी मेळाव्याला हजेरी लावणार आहे. या मेळाव्यास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर इथं विखे पाटील यांच्या पुढाकारातून हा मेळावा आयोजित करण्यात आलाय. अमित शाह पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा दौरा करणार आहेत.
शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनानं शाहांचा दौरा सुरु होईल. सकाळी 11.15 वाजचा दर्शनासाठी मंदिरात दाखल होणार आहे. त्यानंतर अमित शाह सकाळी 11.45 वाजता प्रवरानगर येथील देशातल्या पहिल्या सहकारी परिषद आणि शेतकरी मेळाव्याला हजेरी लावतील. यावेळी त्यांच्यासोबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती असणार आहे.