भविष्य निर्वाह निधी लाभ अर्जातील चुका दुरुस्ती त्वरित करा. महाराष्ट्र कामगार सेनेची विभागीय आयुक्तांना निवेदन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भविष्य निर्वाह निधी लाभ अर्जातील चुका दुरुस्ती त्वरित करा. महाराष्ट्र कामगार सेनेची विभागीय आयुक्तांना निवेदन

सोलापूर // प्रतिनिधी

सोलापूरातील लंगर विडी कंपनीत काम करणा-या महिला विडी कामगारांच्या P.F. नोदणीमध्ये जन्म तारीख, नाव, व मोबाईल नंबर चुकीच्या नोदणी आलेल्या आहेत . त्याची दुरुस्ती त्वरीत करुन मिळावे . अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विष्णू कारमपूरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली भविष्य निर्वाह निधी विभागीय आयुक्त श्री. भुपेन्द्र सिंह यांना देण्यात आले आहे .
विष्णू कारमपूरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली भविष्य निर्वाह निधी विभागीय आयुक्तयांना देण्यात आलेल्या निवेदनात सोलापूरातील लंगर बिडी कंपनी या कंपनीत काम करणा-या महिला कामगारांचे आपल्या पी. एफ. (P.F) कार्यालयीन नोंदी व प्रत्यक्ष कागदपत्रात मोबाईल नंबर , नाव व वय यात तफावत आहे . त्यामुळे विडी कंपनी सदर महिलांचे गेल्या ३ ते ४ महिन्यापासून बंद ठेवले आहेत . कारण महिला विडी कामगारांच्या पी . एफ . रक्कम भरण्यास व सभासदांच्या नावाने पी . एफ . रक्कम कामगारांच्या नांवे भरण्यास अडचणी निर्माण होत आहे . म्हणून कामगारांच्या कागदपत्रात वरील झालेल्या चुका दुरुस्ती केल्याशिवाय काम देता येत नाही असे विडी कारखानदार सांगतात . आणि वरील कागदपत्राची चुका दुरुस्ती करण्याचे सुचना आपल्या कार्यालयामार्फतच करण्यात आहे आहे . म्हणून चुका दुरुस्ती करण्याचे फार्म भरुन आपल्या कार्यालयात दाखल केलेले आहे . त्यास सुमारे ४ ते ५ महिने होत आहेत . अदयापी दुरुस्ती करून मिळाले नाही . त्यामुळे महिला विडी कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे .
तरी माननीयांनी वरील विषयांचे गांभिर्याने विचार होऊन चुकीचे दुरुस्ती त्वरीत करुन विडी कामगारांचे उपासमार टाळावे . ही नम्र विनंती . असे नमूद करण्यात आले .
महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेल्या शिष्ठ मंडळात विष्णू कारमपुरी ( महाराज ) , शोभा पोला , श्रीनिवास बोगा , अंबव्वा पेंटा , पप्पु शेख, यल्लप्पा पेंटा , लक्ष्मीबाई इप्पा , विजयालक्ष्मी बोगम , लक्ष्मी आडकी , आदि उपस्थित होते .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here