भविष्यातील पाणी संघर्ष टाळण्यासाठी पाणी बचत करा – अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांचे प्रतिपादन 

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर,दि. 29 : पाणी हे जीवन आहे. प्रत्येक सजीवाला पाण्याची आवश्यकता आहे. यामुळे पाण्याची बचत आणि काटकसर महत्वाची आहे. भविष्यातील पाण्याचा संघर्ष टाळण्यासाठी पाणी बचत करण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी केले.  

            मुळेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथे जलशक्ती अभियानाची सुरुवात जल शपथ घेऊन करण्यात आली. याप्रसंगी श्री. जाधव बोलत होते. यावेळी रोहयोच्या उपजिल्हाधिकारी चारुशिला देशमुख, जिल्हा जलसंधारण अधिकारी अण्णासाहेब कदम, तहसीलदार अमोल कुंभार, उपअभियंता श्री.अडते, क्षीरसागर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

            श्री. जाधव यांनी सांगितले की, घराच्या छतावरील पाणी वाया घालविण्याऐवजी ते पाणी जमिनीमध्ये जिरविणे गरजेचे आहे. ही कामे रोजगार हमीतून करता येणार आहेत. प्रत्येक नागरिकांनी पाण्याची बचत करण्याचा प्रयत्न करावा. पृथ्वीवरील जीवसृष्टीचा समतोल राखायला हवा. जलसंधारणाच्या उपाययोजना करणे काळाची  गरज आहे. जिल्हा परिषदेमध्येही जलशक्ती अभियानाची शपथ घेण्यात आली. जलसंधारण कार्यालयातही शपथ घेण्यात आली.  

            मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जलशक्ती अभियान यावर आढावा घेऊन सूचना दिल्या होत्या. जलशक्ती अभियानासाठी प्रत्येक महत्वाच्या कार्यालयात सर्वांनी जलशपथ घ्यावयाची आहे. अभियानाची सुरुवात प्रत्येक गावातून होण्यासाठी ग्रामपंचायतीने शक्य झाल्यास विशेष ग्रामसभा आयोजित करावी किंवा त्यांच्याकडील नियमानुसार 1 एप्रिल ते 7 एप्रिल 2022 या दरम्यान ग्रामसभा आयोजित करावी. ग्रामसभेची सुरुवात जलशपथ घेवून करावी आणि सभेमध्ये गावाच्या पाण्याची गरज, उपलब्ध साधने यावर चर्चा करुन आवश्यक उपाय योजनेसाठी गावाचा जल-आराखडा तयार करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या. 

            29 मार्च ते 30 सप्टेंबर 22 पर्यंत हा कार्यक्रम राबवणे आहे. त्याअंतर्गत ग्रामसभा एक ते सात एप्रिलपर्यंत घेण्यात येणार आहेत. जलशक्ति केंद्र उघडून त्यामार्फत जनजागृती करणे, गावाचा कृती आराखडा तयार करणे, त्यानुसार जिल्हा कृती आराखडा करणे आणि मान्सूनपूर्वी त्या कृती आराखड्यामधील कामे पूर्ण करणे असे आहे. त्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सर्व पाण्याच्या स्त्रोताचे जिओ टॅगिंग करून रेकॉर्डवर नोंदणी करण्याविषयीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जलशक्ति अभियान हे जनआंदोलन करण्यासाठी प्रयत्न करणे सर्व विभागांच्या समन्वयातून गावांमध्ये करावीत. गावांमधील गुण ओळखून त्याप्रमाणे कामे हाती घ्यायची आहेत. जिल्हास्तरीय समितीचे जिल्हाधिकारी अध्यक्ष आणि जिल्हा जलसंधारण अधिकारी सदस्य सचिव असणार आहेत. दर पंधरा दिवसांनी बैठक घेऊन  हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here