१२ जून रोजी मंगळवेढा तालूक्यातील बावची येथे पिसाळलेल्या लांडग्याने एकूण सहा जणांचा चावा घेवून गंभीर जखमी केलेले आहे. यामध्ये यशराज राजू फोंडे वय १५ , सुकदेव सिदू जाधव वय ६०, तानाजी श्रीरंग चव्हाण वय ३२ यांना तातडीने सोलापूर येथे सिव्हील हॉस्पीटलमध्ये पुढील उपचारासाठी महेश खांडेकर यांनी स्वतःच्या गाडीतून नेले . याशिवाय अनुसया बसवराज माळी वय ३५, पार्वती इराप्पा माळी वय ३२, भारत विठोबा म्हमाणे रा. . पौट यांनाही लांडग्याने जखमी केलेले आहे. तसेच या हल्ल्यात दोन कुत्रे , एक गाय व म्हैस यांनाही चावले आहे.
सदर लांडगा पिसाळलेला असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. सायं ४ ते रात्री १ वाजेपर्यंत हा थरार चालू होता.त्यामुळे बावची परिसरातील सर्व नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली. या परिसरात वारंवार अशा घटना घडत असताना वनविभागाचे याकडे लक्ष नसल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
यावेळी हुलजंती बीटचे हवालदार सलगर, बावचीचे पोलीस पाटील श्री . महावीर भोसले यांनी ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांना घेवून रात्री पोलीसांशी संपर्क साधून ही बाबमी कळविली व घटनास्थळी भेट दिली सावध राहून घाबरून न जाण्याचे आवाहन केले .