बार्डी ग्रामपंचायतीच्या उपसरंचपदी नूरजहाँ गफुर सय्यद यांची बिनविरोध निवड

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

बार्डी ग्रामपंचायतीच्या उपसरंचपदी नूरजहाँ गफुर सय्यद यांची बिनविरोध निवड

करकंब बार्डी ता. पंढरपूर येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सलग दोन वेळा निवडून आलेल्या नूरजहाँ गफुर् सय्यद यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नूरजहाँ सय्यद या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दिनकर कवडे यांच्या गटाच्या विद्यमान सदस्या आहेत. सर्व सदस्यांना उपसरपदाची संधी मिळावी म्हणून आजपर्यंत सुनिल वसेकर, कल्याण कवडे यांना संधी देण्यात आली होती. आज नूतन उपसरपंचपदी नूरजहाँ सय्यद यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीच्या वेळी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दिनकर कवडे, सरपंच सौ माधुरी अभिजीत कवडे, युवा नेते अभिजीत कवडे ग्रामसेवक चंद्रशेखर गिडे, पोलीस पाटील ऍड. नानासाहेब शिंदे ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कवडे, पंडित खंदारे, बबलू भाई सय्यद उमेश खंदारे,कांतिलाल वसेकर, माऊली वसेकर बिभीषण लाटे , शंकर चव्हाण आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here