बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने एन. ए. एच. आय च्या विरोधात भव्य रास्ता रोको आंदोलन
.ए. एच. आय. यांच्या चुकीच्या धोरणामुळे मोडनिंब येथे नॅशनल हायवे येथे उड्डाणपूल करण्यात आला. त्यामुळे मोडनिंब शहराचे खूप मोठे नुकसान झाले आहे. मोडनिंब हे महाराष्ट्रामध्ये गजबजलेली,गाजलेली बाजारपेठ आहे. उड्डाणपुलामुळे बाजारपेठेवर, व्यापारी वर्गावर, कामगारांवरती व तसेच सर्व उद्योग व्यवसायावरती खूप मोठे परिणाम झालेले आहेत. तसेच उड्डाणपूल झाल्यामुळे जवळपास 27-28 अपघात होऊन 60 70 माणसं मृत्युमुखी पडली आहेत. दर दोन दिवसाला लहान-मोठे अपघात घडतात. बरेच माणसांचे हात पाय मोडलेले आहेत. त्यासाठी मोडनिंब येथे बायपास करणं गरजेचं आहे. आणि त्या बायपास रस्त्याचे काम लवकरात लवकर चालू करावे. वरवडे टोल नाका येथे मोडनिंब व मोडनिंब परिसरातील सर्व वाहनधारकांना टोल आकारला जातो तसेच तो टोल नियमबाह्य आकारून वाहनधारकांशी गैरवर्तुनी केली जाते. तर तो टोल तात्काळ बंद करावा. भिमानगर ते सोलापूर सर्विस रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे. शेटफळ ते माढा हायवे हा अधिकृत रस्ता हायवे ला जोडलेला नाही. झेब्रा क्रॉसिंग केलेले नाही.बोर्ड नकाशा दिशा नकाशा बोर्ड लावलेला नाही. अनाधिकृत शेटफळ माढा हायवे तसाच जोडलेला आहे. यामुळे तेथे बरेच अपघात होऊन जवळपास 27 28 लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत. मोडनिंब उड्डाणपूल व शेटफळ ते माढा हायवे वरती कसले हाय मास्ट दिवा बसवलेला नाही. तर या ठिकाणी लवकरात लवकर हाय मास्ट दिवे बसवून सर्विस रस्त्याचे काम लवकरात लवकर चालू करावे या विविध मागण्यासाठी बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको करण्यात आला.
यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजीराजे काबळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्नशांत गिड्डे, मातंग एकता आंदोलनाचे रामभाऊ वाघमारे नितीन वाघमारे, बापूसाहेब शिंदे, सुभाष जानराव, राजकुमार लांडगे, व्यापारी असोसिएशनचे पोपट दोभाडा, शिवसेना गटनेते दिपक सुर्वे, युवा उद्योजक महावीर वजाळे, मोडनिंब ग्रामपंचायत सदस्य बालाजी पाटील, कुरण गिड्डे, मोडनिंब ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच सदस्य, स्वप्नील ओहोळ, शाहू फुले आंबेडकर संस्थेचे प्रमोद गाडे, मोडनिंब गावचे माजी सरपंच बाबुराव सुर्वे, चांगदेव वरवडे, ग्रामपंचायत माजी सदस्य उदय जाधव, भारतीय जनता पक्षाचे राहुल केदार, धनाजी लादे, सतीश वाघमारे, मोहम्मद शेख,बापू लोंढे, संतोष जानराव, संतोष वाघमारे, तानाजी जोगदंड,मल्हारी पाळके, शरद लंकेश्वर, महेंद्र लंकेश्वर,भैय्या वाघमारे, नागनाथ आप्पा ओहोळ, विनोद नागटिळक इत्यादी बहुसंख्याने कार्यकर्ते मोडनिंब मधील विविध पक्षाचे, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ व्यापारी वर्ग तसेच मोडनिंब परिसरातील नागरिक उपस्थित होते.