बळीराजा शेतकरी संघटनेच्या विविध निवडी संपन्न..!
पंढरपूर-बळीराजा शेतकरी संघटना पंढरपूर तालुक्यातील विविध पदाधिकार्यांच्या निवडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाल्या यामध्ये पंढरपूर तालुका युवा अध्यक्षपदी औदुंबर सुतार, तालुका उपाध्यक्षपदी अंबादास भूई यांची निवड करण्यात आली.
यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर म्हणाले की शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बळीराजा शेतकरी संघटना कायम आग्रही असते शेतकऱ्यांच्या पुराचे अनुदान असो गारपीट/आवकाळी अनुदान असो शेतकऱ्यांचे उसाचे बिल कामगारांच्या पगारी यासाठी बळीराजाचा कायम लढा यापुढेही अशा युवकांना घेऊन बळीराजा शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करेल यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाअध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर जिल्हा संघटक शेखर कोरके, सरपंच संघटनेचे नितीन काळे जिल्हा उपाध्यक्ष सर्जेराव शेळके, नितीन गावडे, तानाजी सोनवले, तालुकाउपाध्यक्ष रामेश्वर झांबरे, तालुका संघटक अनंता लामकाने, रमेश लंगोटे, विष्णू भोसले, अनिल शिंदे ,रणजित शिंदे शेतकरी उपस्थित होते.