बळीराजा शेतकरी संघटनेची दूध व ऊस परिषद 17 ऑक्टोबर रोजी दिघंची येथे पार पडणार.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर // प्रतिनिधी

बळीराजा शेतकरी संघटनेची दुध व ऊस परिषद रविवार दिनांक 17 ऑक्टोंबर 2021 रोजी ठिकाण-दिघंची येथे दुपारी ४ वाजता आयोजित केली आहे
केंद्र सरकारने FRP मोडतोड करणेचे ठरवले आहे त्यास विरोध करण्याबाबत
चालू गळीत हंगामात ऊसदराचे उत्पादनखर्चावर आधारित ऊस दर मागणी करणेबाबत गळीत हंगाम 18/19 ,19/20 मधील FRP उशिरा दिले संबंधी कारखान्याकडे १५% व्याजासह मागणी करणे बाबत
ऊस बिले बुडीत करणारे कारखानदारावर फौजदारी दाखल करून वसूल करणेबाबत
दूध उत्पादक शेतकऱ्यास उत्पादनखर्चावर आधारित गाय, म्हैस दुधाचे भाव मिळणेबाबत.
 कोरोना काळातील दूध उत्पादकांचे फरकाचे बिल व्याजासह मिळणेबाबत.
 केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी कायदे रद्द करणेबाबत.
 राज्य सरकारने कर्जमाफी बाबत धोरण ठरवूनही अंमलबजावणी नझालेबाबत.
 पिक विमा आणि त्याबाबत असणारे धोरण ठरवण्या बाबत.

यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, प्रदेशाध्यक्ष बीजी काका पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. उन्मेश देशमुख, सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, सांगली जिल्हाकार्याध्यक्ष डॉ. दिगंबर मोरे, जिल्हाउपाध्यक्ष जयवंत गायकवाड, अशोक गायकवाड, अशोक सलगर, मिलिंद तोडकर, औंदुबर सुतार,अर्जुन वाघमारे शेतकरी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here