फौजदार केतन मांजरे यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने सत्कार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

उत्कृष्ट पोलीस ठाणे निवडण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडून माहिती मागविण्यात आली होती.

सदर माहिती सर्व घटक प्रमुखांकडून कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर. सर्वाधिक प्राप्त गुणांनुसार सर्वोत्कृष्ट ११ पोलीस ठाण्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये नेहमीच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणाऱ्या गुन्हेगारी क्षेत्रात अंकुश ठेवणारे असे सोलापूर पोलिस आयुक्तालय हद्दीत असणारे जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून सुहास वारके विशेष पोलीस महानिरीक्षक (का.व. सु.) पोलीस महासंचालक यांच्या वतीने निवड करण्यात आली आहे यानिमित्ताने जोडभावी पोलिस ठाण्यातील नेहमीच दमदार कामगिरी आणि गुन्ह्याचा वेगवान तपास करणारे व गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारे , बेकायदेशीर धंद्यांवर अंकुश ठेवून असणारे आणि समाज कार्यात देखील नेहमी सक्रिय असणारे तसेच सर्वसामान्य माणसाला कायद्याच्या चौकटीत राहून मदत करणारे गुन्हेगारांचा कर्दन काळ तर सर्वसामान्य माणसाचा आधार असलेले
जोडभावी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटी करण विभागाचे प्रमुख फौजदार केतन मांजरे यांचा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने शाल पुषपगुच्छ देऊन व मिठाई भरवून सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार , सोलापूर शहर अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार , शहर कार्याध्यक्ष अन्सार तांबोळी , ( बी एस )राम हुंडारे , अक्षय बबलाद ,वसंत हांडे , नागनाथ गणपा ,तसेच पोलिस कर्मचारी , गोपाळ शेळके ,आबा थोरात,सोमनाथ थिटे ,सुरेश जमादार , राजेश घोडके , बाळू माने आदी उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here