फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमधील फार्मसी कॉलेमध्ये मॉडेल फार्मसीचे उदघाटन डॉ.एस ए कटरे ( गणित विभाग प्रमुख पुणे विद्यापीठ) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. अजय देशमुख (संचालक भास्कराचार्य प्रतिष्टान पुणे) संस्थेचे चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर,कॅम्पस डायरेक्टर संजय अदाटे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय बैस,अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. आर बी शेंडगे, डी फार्मसीचे विभाग प्रमुख प्रा.सूरज कांबळे आदी उपस्थित होते.
ही मॉडेल फार्मसी उभा कण्याचे काम महाविद्यालयातील डी फार्मसी द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी केले आहे. या मॉडेल फार्मसीमध्ये अभ्यासक्रमात असणाऱ्या सर्व आजारांची माहिती व त्यावरील मार्केटमध्ये उपलब्ध असणारी औषधे याबद्दल पोस्टर व औषधांची रिकामी पॉकेट्स उपलब्ध करून माहिती सादर केली. मॉडेल फार्मसी उभा करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रा. रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास प्रा. जी डी डोंगरे,प्रा. एस जी मणेरी,प्रा रिचा फराटे, प्रा अल्पेश चव्हाण, प्रा स्मिता स्वामी आदी उपस्थित होते.