फॅबटेक पब्लिक स्कूलचे प्राचार्य सिकंदर पाटील यांना सी. व्ही.रमण एज्युकेशन अवॉर्ड फॉर प्रिन्सिपॉल २०२१ प्रदान

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

फॅबटेक पब्लिक स्कूलचे प्राचार्य सिकंदर पाटील यांना सी. व्ही.रमण एज्युकेशन अवॉर्ड फॉर प्रिन्सिपॉल २०२१ प्रदान

 

सांगोला: फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य  सिकंदर पाटील  यांना शिक्षक दिनानिमित्त थिंक निती  क्युरिअस माइंड, सी व्ही रमण सोसायटी,न्यू दिल्लीचा सी व्ही रमण एज्युकेशन अवॉर्डने गौरविण्यात आले आहे. भारतामधील २०,०००  शाळांपैकी ५००  शाळांना नामांकन मिळाले होते, त्यापैकी भारतातील १५४  प्राचार्यांना सी. व्ही. रमण एज्युकेशन अवॉर्ड २०२१ ने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठीचे सर्व निकष प्राचार्य  सिकंदर पाटील यांनी पूर्ण करत फॅबटेक पब्लिक स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे .या पुरस्कारासाठी  सांस्कृतिक उपक्रम, वैज्ञानिक उपक्रम, खेळ उपक्रम, तसेच कोरोनाच्या काळामध्ये उत्कृष्टरित्या राबवलेले शैक्षणिक उपक्रम या सर्व निकषांना पार करत उत्कृष्ट नेतृत्व शैली सिद्ध करून या सी. व्ही. रमण एज्युकेशन अवॉर्डसाठी प्राचार्य  सिकंदर पाटील पात्र ठरले आहेत. संस्थेचे चेअरमन  व मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी प्राचार्य  सिकंदर पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  संस्थेच्या वतीने प्राचार्य सिकंदर पाटील यांचा सत्कार  कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांनी केला. प्राचार्य  सिकंदर पाटील यांना मिळालेला  पुरस्कार हा संस्थेचा गौरव वाढविणारा आहे व इतरांना प्रेरणादायी आहे, यापुढे असेच कार्य त्यांच्याकडून होत राहावे असे उद्गार श्री. संजय अदाटे यांनी काढले. तसेच संस्थेचे संचालक प्रा.अमित रुपनर, संचालक  श्री.दिनेश रूपनर, संचालिका सौ. सारिका रुपनर, अभियांत्रिकीचे  प्राचार्य डॉ.आर बी शेंडगे, डिप्लोमा कॉलेजचे प्राचार्य प्रा. शरद पवार,  फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय बैस, अकॅडमिक  डीन प्रा. टी एन जगताप यांनीही प्राचार्य  सिकंदर पाटील यांचे अभिनंदन व कौतुक केले.  शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही पाटील सरांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here