सांगोला: एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर हे नाव इतिहासात अजरामर आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी जयंती फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अमित रुपनर,कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, टेक्निकल कॅम्पसचे कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
प्राध्यापिका स्वाती लोकरे यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्य कर्तृत्वाविषयीची विस्तृत माहिती उपस्थितांना दिली. तसेच डी फार्मसी द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी कु. सुप्रिया बंडगर हिने बोलताना पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या योग्य शासक, संघटक, न्यायप्रिय तसेच धाडसी होत्या. हे सर्व त्यांचे गुण आपण आत्मसात केले पाहिजेत. प्रत्येक महापुरुषांची विचारसरणी आचरणात आणली पाहिजे असे तिने यावेळी उपस्थितांना सांगितले.
यावेळी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस,पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.शरद पवार,अकॅडमिक डीन प्रा. टी. एन. जगताप, डॉ. नरेंद्र नार्वे,.डॉ. अभिमान कनसे,.डॉ.तानाजी धायगुडे, अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक व फार्मसी विभागातील सर्व विभाग प्रमुख,शिक्षक,शिक्षकेत्तर-कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फार्मसीचे प्रा. अमोल पोरे यांनी केले.