सांगोला:फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये शिवणे आणि सांगोला केंद्राची माहे ऑक्टोबर महिन्याची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली.शिक्षण परिषदेचे अध्यक्ष केंद्रप्रमुख डॉ. नामदेव भोसले हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख डॉ नामदेव भोसले यांनी केले. माझी शाळा माझे उपक्रम” या उपक्रमाअंतर्गत फॅबटेक पब्लिक स्कूल ज्यु. कॉलेजचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांनी शाळेमध्ये राबवलेल्या कोरोना जागृती विषयक हँडवॉश उपक्रम,बालिका दिनानिमित गुड टच बॅड टच सेमिनार,बालसंस्कार वर्ग,विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, योग्य संतुलित आहार,जागतिक क्षमा दिवसाचे भेट कार्ड स्पर्धा, माझा ऑक्सिजन माझी जबाबदारी,योग वर्ग,पक्षी वाचवा पर्यावरण वाचवा, ग्लोबल महाराष्ट्र स्टुडंट ऑफ द फ्युचर मधील विद्यार्थ्यांचे उपक्रम इत्यादी ऑनलाइन उपक्रमांबद्दल माहिती दिली. तसेच भाषा अध्ययन निष्पत्तीचे मार्गदर्शन फॅबटेक शाळेचे सतीश देवमारे यांनी केले. यामध्ये लिंक मेथड आणि ॲक्शन मेथड याविषयी मार्गदर्शन केले. तसेच गणित अध्ययन निष्पत्ती चे मार्गदर्शन शाळेचे श्री अजिंक्य गुरव यांनी केले विद्यार्थ्यांना गणित सोडवताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाय योजना यांचे मार्गदर्शन केले .तसेच न्यास आणि अध्ययन निष्पत्ती बद्दल श्री वनिता जाधव मॅडम, स्वाध्याय श्रीमती पूनम शिरसाट, गुणवत्तापूर्ण शिक्षण श्री बालाजी चोपडे व पी एस एल एम बद्दल माहिती डॉक्टर राजेश्वरी कोरे यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय काळे सर यांनी केले.