फॅबटेक ज्युनिअर कॉलेजमध्ये एम.एच सीईटी,नीट मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित फॅबटेक ‌पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर
कॉलेज मध्ये इयत्ता  बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एम.एच. सीईटी ,नीट
मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती. इ. बारावीची परीक्षा म्हणजे
विद्यार्थी जीवनाला कलाटणी देणारे वर्ष समजले जाते. बारावी नंतर करिअर
निवडताना योग्य दिशा मिळणे गरजेचे असते,योग्य तज्ज्ञ मार्गदर्शनाची
विद्यार्थ्यांना गरज असते.कोरोना पश्चात करिअरचे चित्र कशाप्रकारे बदलत
आहे? कोणत्या शाखेसाठी किती महत्त्व आहे? विशिष्ट करिअरसाठी नेमके
कशाप्रकारे तयारी करायची? असे अनेकविध प्रश्न  पालकांच्या व
विद्यार्थ्यांच्या मनात पडलेले असतात, यासाठी फॅबटेक ज्युनिअर कॉलेजमध्ये
 मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्रमुख पाहुणे ज्युनिअर
कॉलेजचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील ,ए ओ.वर्षा कोळेकर प्रा.अजय सर,
सुपरवायझर सौ.वनिता बाबर हे लाभले. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन
करून दीप प्रज्वलन करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मेडिकल,
फार्मसी ,इंजीनिअरिंग प्रवेश परीक्षांसाठी शहरात कोचिंग क्लासेस साठी
जाणे शक्य नसते, म्हणून स्पर्धा परीक्षासाठी क्रॅश कोर्स‌ मार्गदर्शन
आयोजित केले आहे असे ज्यु.कॉलेजचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांनी
सांगितले . करिअर समुपदेशक प्राध्यापक अजय सरांनी एक डेमो लेक्चर घेतले.
या क्रॅश कोर्स कार्यशाळेत सुमारे ३५० विद्यार्थी व पंचवीस शिक्षक
उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब
रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर श्री अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री दिनेश
रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे,  ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य
श्री सिकंदर पाटील यांचे या एम.एच सीईटी, नीट  कार्यशाळेसाठी  मार्गदर्शन
लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सतीश देवमारे यांनी केले.
कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here