फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी  व युएस क्वालिटी फार्मा कंपनी सांगली यांच्या मध्ये सामंजस्य करार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्हयात  आपले विशिष्ट स्थान निर्माण करणाऱ्या फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमधील  कॉलेज ऑफ फार्मसी  व युएस क्वालिटी फार्मा कंपनी सांगली  यांच्या मध्ये सामंजस्य करार करण्यात आला असल्याची  महिती संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे यांनी दिली.

    अशा प्रकारे सामंजस्य करार केल्यामुळे विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल ट्रेनींग मिळण्यास मदत होणार  आहे. यामुळे संबंधीत उत्पादनाबद्दल माहिती मिळणार आहे.   विद्यार्थ्याला  औद्योगिक क्षेत्राबद्दलची आवड निर्माण होऊन एक प्रकारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन  मिळणार असल्याचे फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस  यांनी सांगितले.

 विद्यार्थ्यां मध्ये कुशल निर्णय क्षमता व नेतृत्व गुण आत्मसात करण्यासाठी व भविष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघण्यासाठी   हा सामंजस्य करार करण्यात आला आहे असे युएस क्वालिटी फार्मा कंपनी  सांगलीचे चेअरमन  श्री उमेश होनराव म्हणाले.

    हा सामंजस्य करार संस्थेचे चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर,कार्यकारी संचालक श्री.अमित रुपनर, संचालक श्री. दिनेश रुपनर, संस्थेचे  कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय बैस व प्रा.सुरज मणेरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here