फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीमधील पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये ११ विद्यार्थ्यांची निवड.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सांगोला: येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘अँटीला हेल्थकेअर’ गोवा  या कंपनीच्या वतीने  पूल कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन दिनांक १ जुलै रोजी  करण्यात आले होते, यामध्ये एकूण ११ विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी सांगितले.
   या  पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये अँटीला हेल्थकेअर कंपनीचे  मॅनेजिंग डायरेक्टर मयूर चिंचणीकर व त्यांचे सहकारी यांनी विद्यार्थ्यांची टेक्निकल टेस्ट, तांत्रिक कौशल्य व मुलाखत या प्रक्रियेद्वारे  निवड करण्यात आली.  डी फार्मसीच्या  शेवटच्या वर्षांमध्ये शिकत असलेले फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीचे १० विद्यार्थी अंकिता घाडगे,धनश्री जाधव,सुप्रिया काशीद,ऋतुजा हाके,रोहिणी शिनगारे,सोनाली कोकरे,जयश्री गाडेकर,ओंकार सुरवसे,विजय वाघमारे, पल्लवी जमखंडी आणि श्रीराम कॉलेज ऑफ फार्मसी,पाणीव कॉलेजची गीतांजली थिटे १ अशा एकूण ११ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
    या निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे  संस्थेचे चेअरमन  श्री. भाऊसाहेब रूपनर, मॅनेजिंग डायरेक्टर श्री अमित रुपनर,  कार्यकारी संचालक  श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे,  प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी अभिनंदन केले. हा कॅम्पस ड्राईव्ह यशस्वी पार पाडण्यासाठी   ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा.एस एम काझी यांचे सहकार्य लाभले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here