फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ संजय बैस ‘वर्ल्ड फार्मासिस्ट डे’ दिवशी बेस्ट फार्मासिस्ट पुरस्काराने सन्मानित

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ संजय बैस ‘वर्ल्ड फार्मासिस्ट डे’ दिवशी बेस्ट फार्मासिस्ट पुरस्काराने सन्मानित

सांगोला बी फार्मसी कॉलेज अँड इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी अंबाजोगाई बीड, असोसिएशन ऑफ फार्मसी प्रोफेशनल महाराष्ट्र स्टेट ब्रँच,वेस्ट इंडिज इंटरनॅशनल ब्रँच आणि एपीपी मॉलिक्युलर फार्माकॉलॉजि डिव्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने इंडो-मलेशियन इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ संजय बैस यांना बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ अंबेजोगाई संस्थेचे सचिव मा राजकिशोर मोदी यांच्या हस्ते बेस्ट फार्मासिस्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

डॉ. एस के बैस यांना एकूण ३२ वर्षाचा टिचिंगचा अनुभव असून आत्तापर्यंत त्यांनी ४२ रिसर्च पेपर्स, ६ रिव्हिव्ह आर्टिकल, ९ रिसर्च पब्लिकेशन इन स्कोपस इंडेक्सइड जर्नल्स, ४ पोस्ट पी एचडी पब्लिकेशन, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली एम फार्मसीच्या १४ विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. ५ विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पी एचडी करीत आहेत. त्यांची ५ पुस्तके प्रकाशित आहेत, १ पेटंट फाईल, १ स्टार्टप नोंदणी,५ पोस्टर प्रेसेंटेशन, आत्तापर्यंत ४० ट्रैनिंग अटेंड केले आहेत. ५ ठिकाणी गेस्ट लेक्चरर म्हणून आमंत्रण, डी बाटु विद्यापीठाचे पी एचडीचे अधिकृत गाईड म्हणून मान्यता, डी बाटु विद्यापीठाचे प्रोफेसर व प्राचार्य म्हणून त्यांना मान्यता मिळाली आहे. त्यांना एम फार्मसीमध्ये सेकंड टॉपर म्हणून सिल्वर मेडल मिळाले आहे. डॉ बैस हे इंडियन फार्मासिस्ट असोसिएशन न्यू दिल्लीचे लाईफ टाईम मेंबर, असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर ऑफ इंडियाचे लाईफ टाईम मेंबर, रजिस्टर्ड फार्मासिस्ट महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलचे मेंबर तसेच त्यांना बेस्ट रिसर्चर म्हणून २००० चा अवॉर्ड, २०२० चा नॅशनल एज्युकेशनल अकॅडमिक एक्सलन्स अवॉर्ड तसेच ‘बेस्ट प्रिंसिपल ऑफ दी इयर २०२२’चा बहुमान आणि आता बी फार्मसी कॉलेज अँड इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी अंबाजोगाई बीड यांच्या तर्फे बेस्ट फार्मासिस्ट पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी समाधान व्यक्त केले.

हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन मा. श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री. अमित रुपनर, संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे यांनी प्राचार्य डॉ. संजय बैस यांचे अभिनंदन केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here