फॅबटेक कॉलेजच्या डी फार्मसी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सांगोला: येथिल  फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये शै. वर्ष २०२२ -२३ मध्ये
प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष डी फार्मसी  विद्यार्थ्यांचे स्वागत  मोठ्या
उत्साही वातावरणात करण्यात आले. हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन मा.श्री.
भाऊसाहेब रुपनर,मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर,  कार्यकारी संचालक
श्री दिनेश रुपनर, यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर
श्री. संजय अदाटे  यांच्या उपस्थितीत पार पडला.

      हा कार्यक्रम प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी
महाविद्यालयाच्या वतीने व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षात
 प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे  पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कॅम्पसमध्ये असणाऱ्या सर्व सोयी-सुविधेबद्दलची माहिती कॅम्पस डायरेक्टर
श्री संजय अदाटे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ.संजय बैस यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना
डी फार्मसीचे  दूरगामी होणारे फायदे सांगून प्रवेश घेतलेल्या सर्व
विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या. यावेळी डी फार्मसी विभागाचे विभागप्रमुख
प्रा. सुरज कांबळे  सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित  होते.

           उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना विभागप्रमुख व स्टाफ यांची ओळख
करून  देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना त्यांचे वर्ग, प्रयोगशाळा,
लायब्ररी,  ऑफिस,  इत्यादी विभागांची माहिती करून दिली.  पूर्ण वर्षाचे
शेड्युल यावेळी विद्यार्थांना सांगितले. या वेळी फणी गेम्स, गीत  नृत्य व
संगीत खुर्चीचा खेळ खेळण्यात आला. यामध्ये आशिष आलदर हा विद्यार्थी प्रथम
आला.  सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये आपला सहभाग नोंदविला. सदर
कार्यक्रमात मिस फ्रेशर व मिस्टर फ्रेशर यांची निवड करण्यात आली.मिस
फ्रेशर म्हणून कु. पल्लवी कोकरे व मिस्टर फ्रेशर म्हणून डुंगरमल घांची
यांची निवड करण्यात आली. मा. प्राचार्य यांचे हस्ते त्यांचा सत्कार
करण्यात आला.  यावेळी सर्व नवीन विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात  आला.

    या  कार्यक्रमाचे  नियोजन  प्रा. सुरज मणेरी, प्रा.गोपिका
डोंगरे,प्रा. रिचाश्री फराटे,प्रा.रोहित पवार, प्रा.अल्पेश
चव्हाण,प्रा.स्मिता स्वामी  यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here