फॅबटेक अभियांत्रिकीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स या विषयावर वेबिनार संपन्न.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

फॅबटेक अभियांत्रिकीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स या विषयावर वेबिनार संपन्न.

सोलापूर // प्रतिनिधी

सांगोला येथील फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स  या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनार साठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अजय देशमुख (पीएचडी इन आयआयटी बॉम्बे) हे ऑनलाईन उपस्थित होते. सध्या ते संचालक म्हणून सेंट्रल फॉर इंडस्ट्रियल मॅथेमॅटिकस व भास्कराचार्य प्रतिष्टान पुणे येथे कार्यरत आहेत. त्यांचे स्वागत प्रा. माधुरी सुरवसे  यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांना फॅबटेक महाविद्यालया बद्दलची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली. हा वेबिनार संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा.श्री. भाऊसाहेब रुपनर यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक प्रा. अमित रुपनर, संचालक दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय  अदाटे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.
    यावेळी बोलताना डॉ. अजय देशमुख यांनी आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्सचा वापर केला जात असून यामध्ये कृषी, आरोग्य, औद्योगिक, संरक्षण अशा अनेक क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्सचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. याशिवाय दैनंदिन जीवनामध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये याचा उपयोग होत असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी बोलताना त्यांनी प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकांनी नवनवे प्रयोग व कल्पना यांना वाव देऊन या क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्सच्या माध्यमातून सर्व गोष्टी कशा साध्य करता येतील हे पहिले पाहिजे. एआय  असलेल्या स्मार्ट मशीस्ना मानवाप्रमाणे विचार करून निर्णय घेण्याची क्षमता असते. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली मशीन लर्निंगचा वापर मशीनला डेटामधून स्वयंचलितपणे कार्य करण्याची परवानगी देते. डेटा सायन्स हे माहिती तंत्रज्ञान व अप्लाइड सायन्स यांचा एकत्रित परिणाम म्हणता येईल,ज्यामुळे उद्योगांच्या दृष्टिकोनातून डेटा छाननी करणे त्याचे प्रारूप ठरविणे, विश्लेषण करणे सुलभ होते अशी माहिती  यावेळी त्यांनी दिली.
     या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे,पॉलीटेक्नीकचे प्राचार्य प्रा. शरद पवार,फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, या कार्यक्रमाचे आयोजक व आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स  विभागाचे प्रमुख डॉ. तानाजी धायगुडे, ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ. साहेबागौडा संगनगौडर, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या सांख्येने ऑनलाईन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. दुर्गा पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. मिलन शेटके यांनी मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here