फॅबटेकमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर सेमिनार संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सांगोला : येथील फॅबटेक टेकनिकल कॅम्पस- कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये दिनांक २७/०६/२०२२ या रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर सेमिनार आयोजीत करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ते प्रा. डॉ. एन बी  पवार  हे होते. ते सध्या संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा या ठिकाणी  प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते सोलापूर विद्यापीठावरील कला व फाइन आर्ट पदावरती कार्यरत आहेत. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन मा. भाऊसाहेब रुपनर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रा. डॉ. एन  बी पवार यांनी आपल्या व्याख्यानामध्ये शिक्षकांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर मार्गदर्शन करताना शालेय शिक्षण, उच्च शिक्षण यावर  विचार करण्याचे इतर महत्वाचे केंद्रीय मुद्दे आणि अंमलबजावणी या विषयावर सविस्तर माहिती दिली. तसेच सरांनी शाळेसाठी ५+३+३+४ या धोरणाविषयी सविस्तर माहिती दिली. उच्च शिक्षणामध्ये क्रेडिट पॉईंटचा वापर करण्यात येत आहे. विद्यार्थी  उच्चशिक्षणामध्ये दोन डिग्रीना प्रवेश घेऊ शकतात याबद्दल त्यांनी माहिती दिली. विद्यार्थी त्यांचा व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये आर्ट व फाइन  आर्ट यांचाही अभ्यास करू शकतात. या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन मा. श्री भाऊसाहेब रूपनर, व्यवस्थापकीय संचालक श्री. अमित रूपनर, कार्यकारी संचालक श्री. दिनेश रूपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांच्यासह इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.आर बी शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, प्रा. डॉ. एन जी नार्वे,डॉ.तानाजी धायगुडे  या सेमिनारला उपस्थित राहिले. यावेळी अभियांत्रिकी,पॉलिटेक्निक व फार्मसी विद्याशाखेतील सर्व   शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.  
 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रियांका पावसकर व आभार प्रदर्शन प्रा. गणेश शिंदे यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here