फॅबटेकच्या आशुतोष चव्हाण या विद्यार्थ्यांची कॉग्निजेंट या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये निवड

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या  मेकॅनिकल  इंजिनिअरिंग विभागातील आशुतोष चव्हाण या विद्यार्थ्यांची  कॉग्निजेंट या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये  निवड झाली असून त्याला ४.५  लाखाचे वार्षिक पॅकेज मिळाले असल्याची  माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली.
कॉग्निजेंट हि  बिजनेस कन्सल्टिंग आयटी कंपनी असून वेगवेगळ्या आऊट सोर्सिंग  सर्व्हिसिंग देण्याचे कार्य करते. या कंपनीचे मेन ऑफिस यूएसए मध्ये असून भारतात देखील मोठे काम सुरु आहे. अशी माहिती मेकॅनिकल  इंजिनिअरिंग विभागा प्रमुख प्रा.संजय पवार   यांनी दिली.
    निवड झालेल्या या विद्यार्थ्यांचे  संस्थेचे चेअरमन  मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.यावेळी संस्थेचे  मॅनेजिंग  डायरेक्टर  श्री. अमित रुपनर, डायरेक्टर  श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार,  मेकॅनिकल  इंजिनिअरिंग विभागा प्रमुख प्रा.संजय पवार,  ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा  संगनगौडर, पदवीचे प्लेसमेंट कॉ-ऑर्डिनेटर प्रा. शैलेश इटकलकर सर्व विभागांचे प्लेसमेंट कॉ-ओर्डीनेटर, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here